🌟नवीन स्त्री रुग्णालयात बाह्य रुग्ण तपासणी व जन्म प्रमाणपत्र देण्यास सुरुवात....!


🌟सर्व नागरिक व लाभार्थी यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक,स्त्री रुग्णालय,परभणी यांनी केले आहे🌟

परभणी (दि.02 मे 2023) :  सार्वजनिक आरोग्य विभाग, आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या माध्यमातून परभणी शहरातील दर्गा रोड, लगतच्या म्युनिसिपल कॉलनी व बँक कॉलनीच्या दरम्यान असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या परिसरातील जागेवर भव्य स्त्री रुग्णालय, इमारत (एम.सी.एच. विंग 100 खाटा) बांधकाम करण्यात आले आहे. 

या स्त्री रुग्णालयात दि. 1 मे, 2023 महाराष्ट्र दिनापासून गरोदर महिला आणि संबंधीत आजार यांची केवळ बाह्य रुग्ण तपासणी करण्यासाठी व जन्म प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी परवानगी देवून सदर कामकाज सुरु केले आहे. तरी सर्व नागरिक व लाभार्थी यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक, स्त्री रुग्णालय, परभणी यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या