🌟पुर्णा तालुक्यातील चुडावा शिवारात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुळसधार पावसाने घेतला लहान बालकाचा बळी...!


🌟हृदयविदारक : सहा वर्षीय मुलाचा अंगावर घरावरील पत्र्यांसह लागडी नाटी कोसळून जागीच मृत्यू🌟 

पुर्णा (दि.०३ मे २०२३) - पुर्णा तालुक्यातील चुडावा परिसरात काल मंगळवार दि.०२ मे २०२३ रोजी सायंकाळी ०४-३० ते ०५-०० वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे चुडावा शेतशिवारातील मारुती नारायणराव देसाई यांच्या कॅनॉल लगत असलेल्या आखाड्यावरील घरावरचे पत्रासह लाकडी नाटी कोसळल्यामुळे सालगड्याचा सहा वर्षीय मुलगा जागीच ठार झाल्याची हृदयविदारक घटना घडली.

या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की चुडावा शेत शिवारात शेत असलेले शेतकरी मारुती नारायणराव देसाई यांच्या शेतात सालगडी म्हणून कामावर असले कानखेड येथील सालगडी रणखांबे आपल्या कुटुंबासह शेतातील आखाड्यावर असलेल्या घरात राहतात काल मंगळवारी सायंकाळी ०४-३० ते ०५-०० वाजेच्या सुमारास   अचानक जोरदार चक्रीवादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली यावेळी घरावरील पत्रांसह लाकडी नाटीही कोसळल्यामुळे घरात असलेला त्यांचा मुलगा गौरव सुनिल रणखांबे वय ०६ वर्षे याच्या अंगावर पत्र व लाकडी नाट पडल्यामुळे त्या खाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच चुडावा पोलिस घटनास्थळी दाखल झाले यावेळी घटनास्थळ पंचणामा करुन चुडावा पोलिसांनी शव ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय ग्रामीण रुग्नालय पुर्णा येथे पाठवले दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून घटनेचा पुढील तपास  पोलीस जमादार प्रभाकर कचवे करत आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या