🌟सोनपेठ येथे भव्य वीर माहेश्वर बालसंस्कार शिबिर सुरू.....!


🌟या शिबिरास अन्नदान करणाऱ्या दात्यांनी श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याशी संपर्क साधावा🌟


सोनपेठ (दि.०२ एप्रिल) :- श्री नंदिकेश्वर मठ संस्थान येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वर्ष 6 वे भव्य वीर माहेश्वर बालसंस्कार एक महिन्याचे निवासी शिबिर सुरू झाले, दिनांक 1 मे 2023 ते दिनांक 28 मे 2023 असे एक महिना या शिबिरात गुरु श्री 108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांच्या मार्गदर्शनात प्रदीप शास्त्री स्वामी (सोलापूर वैदिक पाठशाळेचे प्रधान अध्यापक) तसेच ओमप्रकाश विभूते, नागेश स्वामी व एन.व्हि.स्वामी आदिजन या 50 शिबिरार्थींना जे की मुंबई, लातूर, बीड, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर व परभणी अशा विविध जिल्ह्यातून आलेल्या या 50 शिबिरार्थींना पहाटे योग प्राणायाम, सकाळी संजीवन समाधी आद्य गुरु नंदिकेश्वर महाराज रुद्राभिषेक, दुपारी रुद्रपाठांतर, पंचांग वाचन, आराम तसेच चहा,नाष्टा,भोजन आदिव्यवस्था यथा योग्य करण्यात आलेली असून.एक महिना दिनचर्या सारखी राहणार आहे.या शिबिरास अन्नदान व पूरक गोष्टींची सेवा समर्पित करणाऱ्या दात्यांनी श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याशी संपर्क साधावा मो.8888000832.असे आवाहन श्री नंदिकेश्वर विचार मंच यांच्या वतीने करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या