🌟भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाने काळ्या पैशाचे अडमाप साठवण करणाऱ्यांची नोटा बदतेवेळी उडणार फ्युज ?


🌟वाममार्गाने अफाट कमाई करीत दोन हजारांच्या नोटांची थप्पी मारणारे गोधळावस्थेत🌟 

भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजाराच्या नोटांची छपाई बंद करीत सदरील नोटा बंद करण्याचा घेतलेला निर्णय अनेक धनदांडग्या लबाड लांडग्यांच्या जिव्हारी लागणार असल्याचे दिसत असून या धनदांडग्या लबाड लांडग्या ‘नव आसामीं’चे या निर्णयामुळे दोन हजार रुपयांच्या नोटा बदलतेवेळी अक्षरशः फ्युज उडणार असल्याचे दिसणार आहे.

  मागील अनेक महिन्यांपासून २०००/- (दोन हजार) रुपयांच्या नोटा राष्ट्रीयकृत/खाजगी बँकांतून तसेच एटीएम मशीनींमधून सुध्दा दिसेनास्या झाल्या होत्या त्याच वेळी असा अंदाज जाणकारांमधून व्यक्त केला जात होता की दोन हजार रुपयांच्या या नोटा हळूहळू भारतीय चलनातून बाद होतात की काय ? अखेर जाणकारांनी व्यक्त केलेला अंदाज प्रत्यक्षात खरा ठरला असून भारतीय रिझर्व्ह बँकेने काल शुक्रवार दि.१९ मे २०२३ रोजी अखेर २०००/- (दोन हजार) रुपयांच्या नोटांची छपाई संपूर्णतः बंद केली. या नोटा व्यवहारात असतील असे स्पष्ट जरी केले असले तरी पण रिझर्व्ह बँकेने दि.२३ मे २०२३ पासून या नोटा बँकांमधून स्विकारल्या जातील मात्र दि.३० सप्टेंबर २०२३ पर्यंतच या नोटा बँकात जमा करुन घेतल्या जातीलअसे नमूद केले आहे.

             रिझर्व्ह बँकेने शुक्रवार दि.१९ मे रोजी घेतलेल्या या मोठ्या निर्णयाने दोन हजारांच्या नोटा मुदतीनंतर चलनातून बाद होणार हे आता स्पष्टच दिसू लागले आहे. दि.२३ मे पासून ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत प्रत्येकाला दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत मिळाली असली तरी त्यातही अशी अट लावण्यात आली आहे की एका दिवसात केवळ २० हजार रुपये म्हणजे एकावेळी दोन हजारांच्या केवळ १० नोटा जमा करता येणार आहेत त्यामुळे मोठमोठे भ्रष्ट गुत्तेदार,भ्रष्टाचीरी नौकरशाह,भ्रष्ट राजकारणी अन् काळे कारभार चालवणारे माफिया तस्कर,उद्योगपती अश्या दोन हजारांच्या नोटांची थप्पी लावणाऱ्या बेकायदेशीर चलनी नोटा बाळगणार्‍या,साठवणार्‍या धनदांडग्या लबाड लांडग्या आसामींचे या नोटा बदलतेवेळी अक्षरशः फ्युज उडणार आहेत.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या