🌟परभणी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बैठक संपन्न....!


🌟मराठवाडा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी बैठकीचे आयोजन🌟


 मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्याचा सर्वांगीण विकास व्हावा व मराठवाड्याच्या स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्व सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक कार्यक्रम राबवण्या बाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. शहरातील गंगा मंगल कार्यालयात मराठवाडा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 या बैठकीस मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समितीचे सुभाषराव जावळे, ॲड जी. आर. देशमुख. डॉ केदार खटिग, डॉ धर्मराज चव्हाण,कमलकिशोर अग्रवाल, बालासाहेब घिके , ॲड पवन निकम, संदीप पेडगावकर, विजयकुमार मुंदडा, बंडूनाना सराफ, प्रा. सारंग साळवी, प्रा. के. पी. कणकेसर, ॲड सच्चिदानंद कुलकर्णी, रामेश्वर शिंदे, एस एच हाश्मी ,अरुण पवार ,सुनील घांडगे, स्वप्नील पत्तेवार, बाळासाहेब नरवाडे ,उदय वाईकर, शरद अंभोरे, अनंत बनसोडे, कृष्णा कवडी, संतोष जाधव,p लक्ष्मीकांत कहात, मंचकराव बचाटे ,ओमप्रकाश लड्डा, देवा पाटील आदींची उपस्थिती होती. मराठवाड्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यात व्यापक कार्यक्रम घेण्याच्या दृष्टीने या बैठकीमध्ये सांगोपांग चर्चा करण्यात आली. मराठवाड्याच्या स्वातंत्र्य महोत्सवाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे म्हणून प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन करणे, प्रबोधन करणे, जनजागृती करणे, त्याचबरोबर व्यापक बैठकांचे आयोजन करणे मराठवाड्यातील  सर्व क्षेत्रातील लोकांचा सहभाग या समितीमध्ये करून घेणे, जिल्हा व मराठवाडा स्तरावर विविध कमिट्या स्थापन करणे, मराठवाड्याच्या विकासासाठी लावण्यात आलेल्या घटनेतील कलम 371 (ब) उपयोग करून मराठवाड्याच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्याबाबत शासकीय स्तरावर पाठपुरावा करण्याची व त्यासाठी जबाबदारी फिक्स करण्याबाबत ही चर्चा करण्यात आली,मराठवाड्याचा खरा इतिहास समाजा पर्यंत पोहोचला जावा, मराठवाड्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी समितीच्या वतीने सकारात्मक भूमिका घेऊन विकासाच्या मुद्द्यावर लवकरच व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सर्वानुमते ठरले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या