🌟परभणीचे शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण देशमुख यांचे राज्याचे मुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे यांना साकडे....!


🌟शहरातील नागरी मुलभूत सुविधांचे प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी पाऊल उचलण्याची निवेदनाद्वारे मागणी🌟

परभणी (दि.01 एप्रिल) : महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामांचा प्राधान्यक्रम आणि नागरीकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेवून तातडीने हे प्रश्‍न सोडविण्याकरीता संबंधितांना सूचना द्याव्यात, अशी विनंती शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रश्‍नावर तात्काळ बैठक बोलवावी, असे आदेश संबंधितांना दिले आहेत.

           मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून महानगरप्रमुख देशमुख यांनी महापालिकेतील प्रमुख रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत केल्या गेले. त्यावेळी 80 कोटी रुपयांच्या निधीय मान्यता देण्यात आली. तथापि याकरीता निधी मंजूरी प्रलंबित राहीली आहे. तसेच भूयारी गटार योजने अंतर्गत 10 एक्कर जमीन आपल्या सरकारद्वारे उपलब्ध करण्यात आली खरी, परंतु 179 कोटी रुपयांच्या शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेस सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर सुध्दा याचीही मंजूरी प्रलंबित आहे. महापालिका हद्दीतील मूलभूत सोयी सुविधांकरीता ठोक निधी उपलब्ध करणे, दलित वस्तींच्या विकासाकरीता निधी मंजूर करणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त जिल्हा क्रिडा संकुलाकरीता 25 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा झाली. त्याही बाबत निधीची प्रतिक्षा आहे. स्टेडिअमच्या दुरावस्थेच्या पार्श्‍वभूमीवर देखभाल दुरुस्तीकरीता 2 कोटी रुपये निधी मंजूर करणे गरजेचे आहे, असे देशमुख यांनी नमूद केले.

          महानगरपालिकांच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर पदाधिकार्‍यांच्या शहर, प्रभाग, विभागवार निवडी, त्यांची कार्यक्षमता, नियुक्तीपासून आजपर्यंत कामकाजाचा लेखाजोखा घेणेही गरजेचे आहे, असे म्हटले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या