🌟महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा क्रीडासंकुल येथे मुख्य ध्वजारोहण समारंभ....!


🌟समारंभास राष्ट्रीय पोषाख परिधान करून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले🌟 

परभणी (दि. 29 एप्रिल) : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त्त सोमवार, दि.०१ मे २०२३ रोजी सकाळी ८ वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडासंकुल, परभणी येथे राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य समारंभ आयोजित करण्यात आला आहे  महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त आयोजित या मुख्य कार्यक्रम समारंभाला येताना राष्ट्रीय पोषाख परिधान करून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी केले आहे.

* प्रशासकीय इमारत येथे ध्वजारोहण समारंभ :-

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त्त सोमवार, दि. १ मे २०२३ रोजी सकाळी ७ वाजता प्रशासकीय इमारत, परभणी येथे राष्ट्रध्वज रोहणाचा कार्यक्रम अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या हस्ते पार पडणार आहे महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम समारंभाला येताना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोषाख परिधान करून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या