🌟नांदेड-पुणे एक्सप्रेसमध्ये दोन विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण : मारहाण झालेल्या दोन विद्यार्थात पत्रकार पुत्राचा समावेश .....!


🌟परभणीच्या माजी नगरसेवक पती विरोधात रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल🌟

नांदेड/परभणी :  वातानुकूलित रेल्वे डब्यात बसलेल्या दोन विद्यार्थ्यांना परभणीच्या एका माजी नगरसेवक पतीने जबर मारहाण केल्याची भयंकर घटना ०९ एप्रिल २०२३ रोजी नांदेड-पुणे एक्सप्रेस प्रवासी रेल्वेमध्ये घडली होती या घटनेत गंभीर मारहाण झालेला एक विद्यार्थी पत्रकार सुनिल जोशी यांचा मुलगा आहे या घटने संदर्भात नांदेड रेल्वे पोलिस स्थानकात दि.१८ एप्रिल २०२३ रोजी घटनेतील आरोपी असलेल्या नगरसेवक पती विरोधात पत्रकार सुनिल जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नांदेड येथील २२ वर्षीय दोन विद्यार्थी पुणे येथे शैक्षणिक कामासाठी जाण्यासाठी पुणे एक्सप्रेस रेल्वेत बसले होते यातील एक जण बी १ आणि दुसरा बी ३ डब्यात होता नांदेड ते पूर्णा दरम्यान रेल्वे असताना परभणीचा माजी नगरसेवीकेचा पती असलेले प्रशांत उर्फ बबलू केशवराव नागरे हा बी ३ डब्ब्यात आला यावेळी त्याची व विद्यार्थ्यांची जागेवर बसण्यावरून कुरबुर झाली त्यावेळी नागरे याने विद्यार्थ्यांला जबर मारहाण केली. 'एक बच्चे को उठाणा है' असे तो बोलत होता असे विद्यार्थ्यांने सांगितले.

      दरम्यान, ही घटना मुलाने त्याच्या पालकाला कळवली. पालकांनी परभणी पोलिसांना कळवले. परभणी पोलिसांनी पूर्णा पोलिसांना घटनेची माहिती दिली. रेल्वे येताच पूर्णा पोलिसांनी आरोपी बबलू याला डब्याखाली उतरवून त्याची कानउघडणी केली. तथापी पुर्णाहुन गाडी निघताच बबलू पुन्हा बी ३ डब्यात चढला आणि ' तू पोलिसांना बोलावतोस का ? असे म्हणून पुन्हा त्या विद्यार्थ्यांला मारहाण केली.


      यावेळी घाबरलेला सदर विद्यार्थी बी १ मधील त्याच्या मित्राजवळ जाऊन बसला, तेथेही नागरेने त्याला सोडले नाही. तो तेथे पोहोचला व त्याने विद्यार्थ्यांला लाथा बुक्क्यांने मारहाण सुरू केली  यावेळी उपस्थित दुसऱ्या विद्यार्थ्यांला 'हा कोण लागतो रे तुझा ?' अशी विचारणा नागरेने केली, 'तो माझा मित्र आहे' असे उत्तर मिळताच नागरेने त्यालाही लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. 'काका, मला का मारता ? मी काय केलं ? अशी विनंतीपूर्वक विद्यार्थी बोलत असताना नांगरे त्याला मारतच होता त्याने विद्यार्थ्यांच्या छातीत लाथा मारल्या त्याचे डोके आपटले. कपाळावर मार लागला. डोके आपटल्याने डोक्याच्या मागील बाजूस वेदना झाल्या परभणीला गाडी येताच नागरे उतरून निघून गेला.

     दरम्यान, दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी पुणे येथे पोहोचताच विद्यार्थ्यांनी खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. मारहाणीमुळे दोन्ही विद्यार्थी घाबरले होते ते डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता होती. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी पालकांना बरीच मेहनत घ्यावी लागली दि.१८ एप्रिल २०२३ रोजी या घटनेची तक्रार दैनिक लोकमतचे पत्रकार तथा मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे पालक सुनिल जोशी यांनी नांदेड रेल्वे पोलिसात दिल्यानंतर संबंधित आरोपी नगरसेवक पती प्रशांत उर्फ बबलू केशवराव नांगरे विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक संतोष उनऊने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

-----------------------------------------------------------------------

     बी१ डब्यातील विद्यार्थ्यांला जबर मारहाण सुरू होती. यावेळी डब्यातील काही प्रवाशांनी परभणीहुन रेल्वे निघाल्यानंतर जालना येथील डॉक्टरांना मेसेज करून विद्यार्थ्यांच्या औषधोपचारासाठी रेल्वे स्टेशनवर येण्याची विनंती डॉक्टरांना केली, यावरून विद्यार्थ्यांला झालेली मारहाण किती अमानुष होती, याचा अंदाज येतो.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या