🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या.....!


🌟सर्व मंदिरातील ब्राह्मण पुजारी हटवा : मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकरांची मागणी🌟

✍️ मोहन चौकेकर

* उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सावरकर प्रश्नांवरून राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका 

* लोकसभेपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार, तर येत्या 15 दिवसात ठाकरे गटाचे आमदार शिवसेनेत-आमदार संजय शिरसाटांचा दावा ; मंत्री पद न मिळाल्याने संजय शिरसाट बरगळत आहे व ते स्वतः च उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करु शकतात -- अशोक चव्हाण ;   संजय शिरसाट पोपटवाले ज्योतिषी आहेत का ---- अजित पवार 

* शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, BSE वर उपलब्ध माहितीनुसार, महावीर जयंतीनिमित्त 4 एप्रिलला शेअर बाजाराला सुट्टी असणार 

* पत्राचाळ घोटाळा प्रकरण: राकेश कुमार वाधवान आणि सारंग कुमार वाधवान यांची 31.50 कोटींची संपत्ती जप्त, ईडीने केली मोठी कारवाई 

* काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना गुजरातच्या सुरत सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर, मानहाणीच्या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 13 एप्रिलला होणार

* पुण्यात 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन; एमपीएससीने लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक परीक्षेसंबंधी ट्विटरवर प्रसिद्धीपत्रक केलं जारी

* राज्यभरातील 2200 नायब तहसीलदार, 600 तहसीलदार यांचं बेमुदत कामबंद आंदोलन, राजपत्रित वर्ग-2 नायब तहसीलदार या कार्यकारी पदाच्या विद्यमान ग्रेड-पे मुद्यावरुन पुकारला संप

देशात 119 खोट्या कंपन्या तयार करण्याच्या आरोपावरून जयपूर ; मंदिराचा जिना कोसळून 36 लोक ठार ; इंदौर येथील घटना

* एनसीईआरटी द्वारे पाठ्यपुस्तकांमध्ये बदल; इयत्ता 12 वी इतिहासातून मुघल साम्राज्यावरील धडा हटवला

* महाराष्ट्रात 562 जण नव्याने कोरोना व्हायरस संक्रमीत, तिघांचा मत्यू; राज्यभरात  3,488 सक्रीय रुग्ण 

* आसाममध्ये 'आप'ची सत्ता आल्यास मोफत वीज, सर्व बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचे अरविंद केजरीवालांचे आश्वासन

* माजी सरन्यायाधीश थोट्टाथिल बी राधाकृष्णन यांचे निधन

* मनीष सिसोदिया यांच्या सीबीआय कोठडीत १७ एप्रिलपर्यंत वाढ

* अदानी समूहाला कर्ज देण्यात समस्या नाही, कोणतंही कारण दिसत नाही; सरकारी बँकेचं स्पष्टीकरण 

* आजपासून राज्यातील २२०० नायब तहसिलदार संपावर गेले असून महसूलमधिल नागरिकांच्या सेवा कोलमडल्यात;१९९८ साली वर्ग तीनचा दर्जा वर्ग दोन केला पण वेतन मात्र वर्ग तीनचे.सध्या ४३०० रुपये ग्रेड पे असून ४८०० रुपये ग्रेड पे ची मागणी

* सर्व मंदिरातील ब्राह्मण पुजारी हटवा : मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकरांची मागणी; छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः सुरु केलेल्या परंपरा नष्ट करणार का पुजाऱ्याचा सवाल  

* अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यावर माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केले गंभीर आरोप ;अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले आहे, असा दावा त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवले यांच्याशी त्यांचे आर्थिक संबंध असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही, असा आरोप त्यांनी केला.

* शाळांना २ जूनपासून सुटी लागणार : पहिली ते नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा १५ एप्रिलपूर्वी संपवली जाणार आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होऊन १ मे रोजी त्यांना प्रगतीपत्रक दिली जातील. शाळांना २ जूनपासून सुटी लागणार आहे.

* पत्राचाळ घोटाळा प्रकरण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणातील गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे नॉर्थ गोव्यातील संचालक राकेश कुमार वाधवान व सारंग कुमार वाधवान यांची 31.50 कोटी रूपयांची संपत्ती जप्त, ईडीने केली कारवाई

* आपले सरकार सेवा पोर्टल मार्फत महाराष्ट्र हे सर्वाधिक ऑनलाईन सेवा उपलब्ध करुन देणारे बनले पहिले राज्य, मागील वर्षी सर्वाधिक 34 लाख पुणेकरांनी घेतला सेवेचा लाभ 

* शेअर बाजार: सेन्सेक्स 114 अंकांनी वधारून 59,106.44 अंकांवर तर निफ्टी 38 अंकांनी वधारून 17,398.05 अंकांवर झाले बंद

* मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: आणखी एक साक्षीदार फितूर, मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टात साक्षीदाराने सांगितले की-एटीएसला दिलेल्या जबाबातील गोष्टी आठवत नाहीत; आतापर्यंत 33 साक्षीदार फितूर

* कोरोना: देशात गेल्या 24 तासांत 3600 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, सक्रीय रुग्णांची संख्या पोहोचली 20219 वर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली आकडेवारी

* राज्याच्या तिजोरीत विक्रमी महसूल! राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात सरत्या आर्थिक वर्षात 25 टक्क्यांनी वाढ, 2022-23 या आर्थिक वर्षात 21,500 कोटी रुपये इतका विक्रमी महसूल जमा 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या