🌟परभणी येथे महात्मा फुले जयंती निमित्त समाजहित अभियान जयंतीच्या वतीने गरजू महिलांना साड्या वाटप...!


🌟स्वच्छ्तादुत कावळे मामा व सामाजिक कार्यकर्ते डॉ.सुनील जाधव यांच्या हस्ते साड्यांचे वाटप🌟

परभणी (दि.11 एप्रिल) शहरातील समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठान आयोजित समाजहित अभियान डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने आज दिनांक 11 एप्रिल रोजी राष्ट्रपिता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 196 व्या जयंतीनिमित्त व प्रतिष्ठानचे सचिव रमेश घनघाव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून परभणी शहरातील रेल्वे स्टेशन, बस स्टँड, दर्गा रोड, धार्मिक स्थळे व शहरभर फिरून समाजातील गोर, गरीब, गरजू, निराधार, उपेक्षित महिलांना स्वागताध्यक्ष स्वच्छ्तादुत कावळे मामा व सामाजिक कार्यकर्ते डॉ.सुनील जाधव यांच्या हस्ते साड्यांचे वाटप करून महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले व रमेश घनघाव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या वेळी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष आकाश साखरे, उपाध्यक्ष रमाताई घोंगडे, समन्वयक प्रमोद अंभोरे, रमेश घनघाव, स्वागताध्यक्ष स्वच्छ्तादुत कावळे मामा, कोषाध्यक्ष शेख अझहर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनील जाधव, संदीप वायवळ, दीपक बनसोडे, विनोद वाडेकर, हरदिप सिंग बावरी, प्रकाश अंभोरे, प्रीतम साळवे, शेख सरफराज, प्रशांत वाटोरे, रेखाताई कांबळे, सरीताताई आंभोरे, रामसिंग अंभोरे, शीलवंत घनघाव, तेजस हिवाळे, युवराज सोनवणे, अभिजित सोनवणे, अजय अंभोरे, धम्मपाल वाघमारे, तुकाराम लोखंडे, रणवीर सिंग जुनी आदींनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या