🌟पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत विद्यमान सभापती देसाई यांचा उमेदवारी अर्ज बाद....!


🌟नंदकुमार डाखोरे यांनी लेखी आक्षेप घेतल्यामुळे सुनावणी घेण्यात येऊन सभापती देसाई यांचा अर्ज नामंजूर करण्यात आले🌟

पूर्णा (दि.०७ एप्रिल) - पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रियेत सहकारी संस्था मतदारसंघातून १४ तर ग्रामपंचायत मतदार संघातून ३ असे एकूण १७ उमेदवारी अर्ज नामंजूर झाले आहे. यात माजी सभापती बालाजी देसाई यांच्या अर्जाचा देखील समावेश आहे तर ताडकळस बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघातून १ उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.

 पूर्णा बाजार समितीमधून पूर्णा बाजार समितीचे विद्यमान सभापती बालाजी रामराव देसाई यांचा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज नामंजूर झाला आहे बुधवारी दि.०५ एप्रिल २०२३ पूर्णा व ताडकळस येथील बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या सर्व उमेदवारी अर्जाची छाननी निर्वाचन अधिकारी तहसीलदार माधवराव बोथीकर व नायब तहसीलदार नितीशकुमार बोलोलू यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. त्याबाबत काल गुरुवार दि.०६ एप्रिल २०२३ रोजी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. 

यामधून पूर्णा बाजार समितीचे विद्यमान सभापती बालाजी रामराव देसाई यांच्यासह दशरथ निवृत्तीराव भोसले, काशिनाथ शंकरराव काळबांडे,लक्ष्मण तुळशीराम बोबडे,लक्ष्मीबाई बालासाहेब देसाई यांच्या उमेदवारी अर्जावर नंदकुमार लक्ष्मणराव डाखोरे यांनी लेखी आक्षेप घेतल्यामुळे हे अर्ज सुनावणी घेण्यात येऊन नामंजूर करण्यात आले. तर इतर उमेदवारांचे अर्ज कागदपत्रांची पूर्तता केली नसल्यामुळे नामंजूर करण्यात आले. सुभाष शंकर भिसे, संगीता साहेब सदावर्ते,दिपक पुरभाजी खर्गखराटे, गोपीनाथ बाबा गंगावळे, प्रशांत आप्पाराव कदम,छबु श्रीराम लोखंडे, वासुदेव जनार्दन नवघरे यांची उमेदवारी अर्ज नामंजूर झाले आहेत.तर ताडकळस बाजार समिती मधून ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातून पांडुरंग बाळासाहेब शिंदे यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर झाला आहे.आता उमेदवारी अर्ज परत घेण्याची प्रक्रिया संपल्यानंतरच या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.पूर्णा बाजार समितीच्या

निवडणुकीसाठी सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातून ५८, महिला राखीव मधून १७ इतर मागासवर्गीय मधूनष९ बि.ज.भ. मधून ८ ग्रामपंचाय तसर्वसाधारण मतदारसंघातून २८ अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून १२ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातून १०व्यापारी मतदारसंघातून १२ हमाल मापाडी मतदारसंघातून ९ असे एकूण १६३ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहे तर ताडकळस बाजार समिती सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातून ३३ महिला राखीव मधून १० इतर मागासवर्गीय मतदार संघातून ४ वि.ज.भ.ज मधून ८ ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून २१ अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मधून ८ आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटात घटकातून ६ व्यापारी मतदारसंघातून ८ हमाल माथाडी मतदार संघातून ४ असे एकूण १०२ उमेदवारी अर्ज शिल्लक आहे आता उमेदवारी अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख २० एप्रिल असून ही प्रक्रिया संपल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या