🌟पुर्णेत सलग अठरा तास अभ्यास करून केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.....!


🌟शहरातील बुद्ध विहारात 250 विद्यार्थी विद्यार्थिनींनी सकाळी सहा वाजेपासून अभ्यासाला सुरुवात करीत रात्री बारा वाजेपर्यंत केला अभ्यास🌟

पुर्णा (दि.08 एप्रिल) - भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळ पूर्णाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच औचित्य साधून  बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी 250 विद्यार्थी विद्यार्थिनींनी सकाळी सहा वाजेपासून अभ्यासाला सुरुवात करू न  रात्री बारा वाजेपर्यंत अभ्यास केला.

भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती मंडळाचे अध्यक्ष भदंत पयावंश कार्याध्यक्ष ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे सचिव माजी उपनगराध्यक्ष उत्तम भैया खंदारे स्वागताध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे  उपाध्यक्ष श्रीकांत हिवाळे व जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी या उपक्रमाचे आयोजन यशस्वीपणे केले.

सलग अठरा तास सातत्यपूर्णअभ्यास केल्यामुळे विद्यार्थी विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वृद्धीगत होऊन अभ्यासाची सवय लागण्यामध्ये त्यांना मदत होणार आहे बऱ्याच विद्यार्थी विद्यार्थिनींनी अनौपचारिक रित्या संवाद साधताना सांगितले आम्ही परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचन करून अभ्यास करून अभिवादन केलेले आहे.

या उपक्रमास प्राध्यापक सिद्धांत थोरात ,प्रा.नितीन नरवाडे राहुल धबाले राम भालेराव साहेबराव सोनवणे विशाल कांबळेअतुल गवळी सुरज जोंधळे विजय खंडागळे संदीप खंदारे सोनू काळे बाळू बुरुड पृथ्वीराज खंडागळे प्रा.प्रमोद ढगे राजु जोंधळे सिद्धू जोंधळे व जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या