🌟विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी जिंतूरात सासरच्या मंडळी विरुध्द गुन्हा दाखल...!


🌟सासरच्या मंडळी कडून विविध कारणावरून मानसिक व आर्थिक त्रास मारहाण होत असल्याने गुन्हा दाखल🌟

जिंतुर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.०८ एप्रिल) :-  येथील मौलाना आझाद काॅलनी येथील रहिवाशी शेख वजीर अहेमद जमील अहेमद  यांची मुलगी नेहा सिरत मोहितखान रा.परभणी हिला सासरच्या मंडळी कडून विविध कारणावरून मानसिक व आर्थिक त्रास मारहाण होत असल्याने विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी जिंतूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 याबाबत असे की नेहा सिरत यांचे लग्न 2017 साली मुस्लिम रीतीरिवाजा प्रमाणे मोहितखान खुर्शीदखान रा. गालिबनगर दर्गा रोड परभणी यांच्या सोबत झाले. लग्नात हुंडयात नगदी दोन लाख पन्नास हजार,सोने, चांदीचे साडे चार तोळेदागीने व संसार उपयोगी दोन लाखाचे सामान दील्यांचे तक्रारीत म्हटले आहे .  काही दिवस सासरचे मंडळींनी चांगले नांदवले लग्नाच्या सात-आठ दिवसानंतर मला लग्नात दिलेले (माहेर) चे नगदी पैसे 11000 माहेरी का दिले रक्कम सोबत घेऊन का आली नाही म्हणून पती यांनी शिवीगाळ करून पैसे घेऊन येण्यास सांगितले मी माझ्या वडिलांना फोन करून पैसे घेऊन या म्हणून सांगितले माझे वडिलांनी परभणी येथे11000 रुपये नगदी आणुन दिले. तेव्हा पासून माझ्यावर जाज आणि जुलूम करून शिवीगाळ अपमानस्पद बोलणे सुरुवात केली मी व माझे सासरच्या मंडळीतील व्यक्ती एकत्रित राहत होतो माझी सासू दोन वर्षां पूर्वी मयत झाली तेव्हा पासून नंदन व नंदवाई हे माझ्या घरातच राहत होते. दरम्यान 2018 साली मला एक मुलगा इमादखान वय 5 वर्ष झाला आहे. 2019 साली पोल्ट्रीफार्म टाकण्यासाठी माहेरून एक लाख रुपये घेऊन ये म्हणून तकादा लावला त्यावेळी माझे वडिलांनी अर्बन कॉपरेटिव्ह बँके कडून 50 हजार रुपये कर्ज उचलून 50 हजार रुपये नगदी असे एक लाख रुपये माझ्या पतीस दिले तरी त्यांच्या वर्तणूक मध्ये सुधारणा झाली नाही व त्यांनी मला जास्तच त्रास देण्यास सुरुवात केली. दी.20/7/2020 रोजी मी घरी एकटी असताना माझा नंदवाई शेख मुस्ताक अन्सारी पिता रफिक अन्सारी हा माझ्या घरी आला मी एकटी आहे हे पाहून त्यांनी माझ्या उजवा हात वाईट उद्देशाने पकडून मला म्हणाला की नेहा तू जास्त टेन्शन घेऊ नकोस तु मोहितखान यांचे नादी लागू नकोस तुझी काही अडचण असेल तर मला सांग मी ते पूर्ण करेल माझ्यासोबत गैर वर्तणूक केले हा सर्व झालेला प्रकार मी माझ्या पतीला सांगितल्यावर उलट मलाच थप्पड बुक्क्याने मारहाण केले हॆ प्रकरण त्यांनी आपल्या बहिण भावा सांगितल्यावर त्यांनी सुद्धा मला थप्पड बुके आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली त्यावेळी मी अडीच महिन्याची गर्भवती होती माझ्या पोटात माझ्या पतीने लाथा मारल्यामुळे मला रक्तस्राव सुरु झाल्याने डॉक्टरांनी तात्काळ गर्भ काढण्यास सांगितले सर्व हकीकत मी माझ्या वडिलांना सांगितल्यावर माझ्या वडिलांनी मला जिंतूरला घेऊन आले. नेहा सिरत मोहित खान पठाण राहणार गालिबनगर दर्गा रोड परभणी यांच्या तक्रारी वरून सासरच्या मंडळीतील नवरा मोहितखान खुशीदखान पठाण, दीर मुखीदखान खुर्शीदखान पठाण,ननंद सबाआफरीन मुश्ताक अन्सारी, नंदवाई मोहम्मद मुस्ताक अन्सारी पिता रफिक अन्सारी, चुलत सासू शमाबेगम समीखान पठाण सर्व राहणार गालिब नगर परभणी यांच्यावर कलम 498(अ )354,323,504,506,34 भा. द. वी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे हे करीत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या