🌟परभणीत महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण......


🌟प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रिडा संकुल येथे सोमवार दि.०१ मे रोजी सकाळी ०८-०० वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहन🌟

परभणी (दि.२६ एप्रिल) : महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रिडा संकुल येथे सोमवार दि.०१ मे २०२३ रोजी सकाळी ०८-०० वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन होणार आहे. त्यानंतर पथ निरिक्षण व पथ संचलन होणार आहे. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीर करणाऱ्यांना बक्षीस वितरण केले जाणार असल्याची माहिती  निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली महाराष्ट्र दिनाच्या मुख्य कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या