🌟परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी उष्मघातापासून बचावासाठी काळजी घ्यावी...!


🌟निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांचे नागरिकांना आवाहन🌟

परभणी (दि.24 एप्रिल) : उन्हाळा सुरु झाला असून, दिवसोंदिवस तापमान देखील वाढत असुन दुपारच्यावेळी घराबाहेर पडणं अवघड झाले आहे. अशा उन्हाळ्यामध्ये नागरिकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी स्वतःची काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती नसते. उष्मघातामुळे चक्कर येणे, उष्माघात तसेच विविध आजाराची लागण होण्याची शक्यता असते. यासाठी नागरिकांनी उष्मघातापासून बचावासाठी आपली काळजी घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनत प्राधिकरण विभागाने उष्णतेच्या लाटेवर करावयाच्या उपाययोजनाबाबत आयोजित बैठकीत महेश वडदकर हे बोलत होते.उष्णतेची लाट (Heat Wave) व्यीवस्थाेन कालावधी हा सर्वसाधारणपणे 1 मार्च ते 15 जून असा राहणार आहे. त्यानुसार सर्व विभाग प्रमुख यांनी उष्मा्घाताच्याल अनुषंगाने 1 मार्च ते 15 जून या कालावधी करीता कृती आराखडा तयार करावा. कृती आराखडा तयार करताना मागील पाच वर्षाचे अधिकतम तापमान नोंदीचे दिवस व रात्रीच्यार तापमानाची नोंद, हवेतील आद्रतास व हवेतील धुळी कण (SPM) विचारात घेऊन उष्मातघात प्रवण क्षेत्र निश्चित करावे.

झोपडपट्टी, गर्दीची ठिकाणी, कारखाने, व्य वसाय, वीट भट्टी किंवा इतर व्यवसायामध्ये काम करणारे कामगार, ग्रामीण भागातील यात्रेची ठिकाणी, धार्मिक स्थ ळे इत्यावदीचा विचार करून त्या ठिकाणी आवश्यरक त्या वैद्यकीय सुविधा सर्व आरोग्यद केंद्रावर आहेत की नाही याची खात्री करुन आरोग्य विभागाने नियोजन करावे. आरोग्यी विषयक बाबींसाठी जिल्हाय शल्यतचिकित्सतक हे संपर्क अधिकारी (नोडल अधिकारी) म्हरणून काम करतील. तसेच जिल्हाव आरोग्यस अधिकारी यांच्या्शी संपर्कात राहून आरोग्यस सेवेविषयक प्रत्येीक उपकेंद्र, प्राथमिक आरोग्यन केंद्र, कुटीर रुग्णायलय व जिल्हाक रुग्णा लयातील सर्व आरोग्यष विषय सोयी-सुविधा नागरिकांसाठी पूर्ण वेळ उपलब्धय राहतील याचे नियोजन करावे. नागरिकांनी मदतीसाठी तसेच आपत्काालीन परिस्थितीमध्येष १०७७, १०७०, १००, १०१, १०२, १०४, १०८, ११२ हे संपर्क क्रमांकावर संपर्क करावा. 

उष्मघातेच्या लाटेत नेमकं काय करावे आणि काय करु नये याबाबत परभणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने नागरिकांना खालीलप्रमाणे महत्त्वाचे आवाहन केले आहे. यात पुरेसे पाणी प्यावे, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्यावे. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावे. दुपारी 12  ते 3 वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करावा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. प्रवासात सोबत पिण्याचे पाणी ठेवावे. उन्हात काम करत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ORS, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा. 

अशक्तपणा, डोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत आणि चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना छावणीत ठेवावे. तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करण्यात यावा. तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी. याबाबत जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सूचना पाहाव्यात. शक्यतो पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. तसेच बाहेर कामकाज करत असल्यास मध्ये-मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करावा. 

तर उन्हात अतिकष्टाची कामे करू नये. दारु, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेवू नये. दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे आणि खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत असे आवाहन परभणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनव प्राधिकरण विभागाने केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या