🌟महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ.शिवप्रसाद सानप यांची निवड....!


🌟महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे कार्य यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल त्यांची पुनश्च जिल्हाध्यक्षपदी निवड🌟 

जिंतूर प्रतिनीधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.२७ एप्रिल) :- मागील वीस वर्षापासून परभणी जिल्ह्यात आयुर्वेदाच्या प्रचार व प्रसारासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन महाराष्ट्र प्रांत समितीने परभणी जिल्हाध्यक्षपदी  डॉ. शिवप्रसाद दत्तराव सानप यांची फेर निवड केली आहे शिर्डी येथे हॉटेल जे सी कॅस्टल मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी संपूर्ण परभणी जिल्ह्यात डॉ.शिवप्रसाद सानप यांनी महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे कार्य यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल त्यांची पुनश्च जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.या स्वागत समारंभात डॉ.सानप यांना नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी डॉ. शरद ठुबे, महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ.सतिश भट्टड , प्रदेश अध्यक्ष डॉ.रामदास आव्हाड , डॉ.अनिल दुबे व डॉ. विश्वंभर पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

या नियुक्तीचे सर्व श्रेय त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहकार्य केलेल्या सर्व डॉक्टर्स , सर्व पत्रकार बंधू व सर्व स्तरातील लोकांना दिले या निवडीबद्दल त्यांनी महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे सर्व पदाधिकारी आणि गुरुवर्य  व जिल्हा समितीतील पदाधिकारी व सर्व पत्रकार बंधू यांचे मनापासून हार्दिक आभार मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या