🌟पुर्णा तहसिलचे तहसिलदार माधव बोथीकर शिव रस्त्याची समस्या सोडवल्यासाठी थेट शेतकऱ्याच्या बांधावर...!


🌟बरबडी-सुहागण शिव रस्त्याचा प्रश्न सोडवल्यानंतर शेतकऱ्यांसोबत घेतला गावरान भाजी-भाकरीचा आस्वाद🌟


✍🏻व्यक्ती आणि व्यक्तीमत्व :- चौधरी दिनेश (रणजीत)

पुर्णा (दि.१४ एप्रिल) - प्रशासनात उच्च पदावर कार्यरत असतांना देखील पदाचा यत्किंचितही अभिमान न बाळगता जनसामान्यांत मिसळून त्यांच्या भावनांचा आदर करीत त्यांच्या समस्यांचे अगदी मनापासून निराकरण करण्याचा प्रयत्न करणारे अधिकारी क्वचितच मिळतात अश्याच प्रकारचे एक उच्च पदावरील अधिकारी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना काल गुरुवार दि.१३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ०८-०० ते ११-३० वाजेच्या सुमारास प्रत्यक्षात पुर्णेच्या तहसिलदारांच्या रुपात पाहावयास मिळाले.


पुर्णा तालुक्यातील मौ.बरबडी येथे शिव रस्त्याची समस्या सोडवण्यासाठी पुर्णेचे तसिलदार श्री.माधव बोथीकर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले यावेळी तहसिलदार श्री.बोथीकर यांनी त्या अन्नदाता शेतकरी बांधवांच्या अडचणी प्रत्यक्ष त्यांच्याशी चर्चा करीत जाणून घेऊन त्या शेतकरी बांधवांच्या अडचणी दुर करीत अगदी सर्व शेतकरी बांधवांच्या संमतीने मागील अनेक वर्षापासून बंद पडलेला शिव रस्ता मोकळा करुन देण्याचे अत्यंत महत्वपुर्ण कार्य पार पाडले सदरील बरबडी-सुहागण शिव रस्त्याची मागनी सतत शेतकरी बांधव करीत होते परंतू यापुर्वी तालुक्यात कार्यरत एकही अधिकारी शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत नव्हता परंतु पुर्णा तहसिल कार्यालयात नव्यानेच तहसिलदार पदाचा पदभार स्विकारलेले कर्तव्यतत्पर तसिलदार माधव बोथीकर मात्र याला अपवाद ठरले त्यांनी तात्काळ या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढीत या शिव रस्त्याचा पिढ्यान पिढ्याचा प्रश्न कायमचा सोडवला त्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

यावेळी तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी माधव बोथीकर यांनी शिव रस्त्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवल्यानंतर निवांतपणे सकाळी ११-०० वाजेच्या सुमारास गोविंद लक्ष्मण शिंदे या शेतकऱ्याच्या बांधावर बसुन सर्व शेतकऱ्यांसोबत भाजी भाकरीचा आनंद सुद्धा घेतला त्यामुळे त्यांचा अतिशय मनमिळाऊ आणि प्रामाणिक स्वभाव सर्व शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या मनात आदर निर्माण गेला त्यांच्या या मनमिळाऊ स्वभावाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या