🌟पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाणीपुरवठा योजनेचे १५ हजार रुपयांचे केबल साहित्य चोरी...!


🌟पाणीपुरवठा योजनेतील विद्युत प्रवाहासाठी वापरलेल्या केबलाची नासधूस करीत अंदाजे चारशें फुट केबल केले चोरी🌟

पुर्णा (दि.०५ एप्रिल) - पुर्णा तालुक्यातील मौ.कान्हेगांव येथील ग्रामपंचायत कार्यालया मार्फत कार्यान्वित पाणीपुरवठा योजना ही गावातून अंदाजे सातशे ते आठशें मिटर अंतरावरील विहिरीवर असून या योजनेसाठी ग्रामपंचायत कार्यालयाने महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कडून असलेला खाजगी डिपी बसवला असून या डिपीतून पाणीपुरवठा योजनेसाठी असलेल्या विहिरीवर विद्युत प्रवाहासाठी केबल वापरण्यात आलेले आहे सदरील केबल अज्ञात चोरट्यांनी दि.२९ मार्च ते ३१ मार्च २०२३ च्या दरम्यान तुकडे करुन नासधूस करीत अंदाजे १५ हजार रुपयांच्या केबलची चोरी केली असल्यामुळे ग्रामसेवक राम घोडके यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन अज्ञात चोरट्या विरोधात पुर्णा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या