🌟परभणी जिल्ह्यातील इनामी जमिनीच्या खरेदी-विक्रीवर आक्षेप...!


🌟लोकतांत्रिक जनता दलातर्फे प्रशासनास निवेदन सादर🌟

परभणी (दि.२६ एप्रिल) : इनामी जमिनीची खुलेआम खरेदी, विक्रीवर लोकतांत्रिक जनता दलाच्या पदाधिकार्‍यांनी तीव्र आक्षेप नोंदवून जिल्हा प्रशासनास या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर लक्ष केंद्रीत करीत कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे.

            जिल्ह्यातील जिंतूर, पाथरी, रामपुरी, रेणापूर या ठिकाणच्या देवस्थानच्या इनामी जमिनींची खुलेआम खरेदी, विक्री सुरु असल्याचा आरोप या पदाधिकार्‍यांनी केला. जिल्ह्यातील काही भूमाफियाना प्रशासनातील अधिकारी हाताशी धरून  देवस्थानच्या इनामी जमिनींचे फेरफार करत असल्याचेही नमूद केले. या अगोदर अनेकवेळा ही बाब संबंधित प्रशासन, अधिकारी यांच्या लक्षात आणून देऊनही याकडे दुर्लक्ष करत आहेत. आणि त्यामुळे अशा प्रकारे सुरू असलेली बेकायदेशीर प्रकरणे घडत असून ते लवकरात लवकर थांबविण्यात यावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा लोकतांत्रिक जनता दल बीडचे अध्यक्ष सय्यद सलीम यांनी दिला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या