🌟पुर्णा शहरात सर्वत्र भ्रष्ट गुत्तेदारांचा धुमाकूळ : तत्वभ्रष्ट आजी/माजी लोकप्रतिनिधी भ्रष्ट अधिकारी टक्केवारीसाठी व्याकूळ ?


 🌟शहरात निकृष्ट व बोगस दर्जाची कामे करीत शासनाचा  कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी हडपण्याची प्रत्येकाला चुळबूळ🌟


पुर्णा (दि.०६ एप्रिल) -"पुर्णा शहरात सर्वत्र भ्रष्ट गुत्तेदारांचा धुमाकूळ : तत्वभ्रष्ट आजी/माजी लोकप्रतिनिधी भ्रष्ट अधिकारी टक्केवारीसाठी व्याकूळ ? निकृष्ट व बोगस दर्जाची कामे करीत शासनाचा कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी हडपण्याची प्रत्येकाला चुळबूळ" एकंदर अशी अवस्था शहरात सर्वत्र झाल्याचे निदर्शनास येत असून महाराष्ट्र शासनासह जिल्हा नियोजन समिती,विविध विधान परिषद राज्यसभा सदस्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी शहराच्या विकासासाठी दिलेल्या कोट्यावधी रुपयांच्या विकासनिधीची बोगस व निकृष्ट दर्जाची विकासकाम करुन  सुनियोजित विल्हेवाट कशी लावता येईल या उद्देशाने सैराट झालेले भ्रष्ट अधिकारी/कर्मचारी,तत्वभ्रष्ट आजी/माजी लोकप्रतिनिधी कोट्यावधी रुपयांच्या शासकीय विकासनिधीची विल्हेवाट लावत असतांना नगर प्रशासनातील वरिष्ट अधिकारी मंडळी मात्र या शासकीय विकासनिधीची लुटमार करणाऱ्या टोळक्यांना सातत्याने पाठीशी घालण्याचा गंभीर प्रकार करीत 'हम साथ साथ हैं' अश्या आवेशात तक्रारदारांच्या तक्रार अर्जांना केराची टोपल दाखवीत तक्रारदारांनाच दाबण्याचा गंभीर प्रकार करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.


पुर्णा नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सुधिर पाटील यांची पुर्णा नगर परिषद प्रशासनावर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे नगर परिषदेचा कारभार सैरभैर झाल्याचे निदर्शनास येत असून नगर परिषद मुख्याधिकारी अजय नरळे,प्रभारी नगर अभियंता गायकवाड व सब ओव्हरसियर संजय दिपके शहरात जाणीवपूर्वक निकृष्ट व बोगस विकासकामांना प्रोत्साहन देवून वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहेत की काय ? असा गंभीर प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत असून पुर्णा शहराची अवस्था अक्षरशः हस्तीनापूरा सारखी तर मुख्याधिकारी अजय नरळे यांची अवस्था आधुनिक अंध धृतराष्ट्रा प्रमाणे झाल्याचे दिसत असून भ्रष्ट ओव्हरसिअर संजय दिपके महाभारतातील संजय ची भुमिका सोईस्कररित्या साकारत असून संजय जेव्हडे सांगेल तेवढेच ऐकून त्यावर अंमलबजावणी करण्याचे काम धृतराष्ट्रा प्रमाणे मुख्याधिकारी नरळे करीत असल्यामुळे शहरात 'आंधळ दळतय अन् काळ कुत्र गपागपा पिठ घातय' एकंदर अशी परिस्थिती झाली आहे.


पुर्णा शहरातील मस्तानपुरा नवी आबादी,अलंकार नगर,क्रांतीनगर,अजिजनगर,विजय नगर येथे पालकमंत्री मा. तानाजी सावंत यांच्या जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार विप्लव बजोरीया यांचे आमदार निधी मधुन होत असलेले सिमेन्ट रोड, सिमेन्टच्या नाल्या अंत्यत निकृष्ट दर्जाच्या होत असुन या विकास कामाचे भ्रष्ट गुत्तेदारांना बिल/देयक रक्कमा अदा करण्यात येऊ नयेत तसेच या बोगस कामावर मुख्य नियंत्रक म्हणुन असलेल्या मुख्याधिकारी नरळे,प्रभारी बांधकाम अभियंता गायकवाड,सब ओव्हसिअर संजय दिपके यांना जवाबदार धरुन त्यांची खाते निहाय चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीचे निवेदन पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नगर प्रशासनासह जिल्हाधिकारी यांना देखील देण्यात आले असून निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की पूर्णा शहरातील नगर परिषदचे स्थानिक नगर परिषद सदस्य, अध्यक्ष,उपाध्यक्ष याचे कुठल्याच प्रकारचे नियत्रण नाही किंवा त्यांना विकास कामे करण्यासाठी अधिकार नसून सरकारच्या वतीने केवळ नगर परिषद मुख्याधिकारी व प्रशासकिय अधिकारी हे स्वतःच्या मनमर्जी प्रमाणे बांधकाम करीत असून या बांधकाम करण्याचे प्रस्ताव शासकिय मान्यता घेऊन ठेकेदारांना बांधकाम करण्याचे कार्यारंभ आदेश दिले आहेत याच कार्यारंभ आदेशासोबत ठेकेदारास रोडचे बांधकाम कसे करावे याचे लेखी मार्गदर्शक सुची देण्यात आली असून सुद्धा ठेकेदार या नियम निकषाची पायमल्ली करत आहेत सिमेन्ट रोडसाठी जमिनीचे लेव्हलिंग सपाटीकरण केले जात नसून सिमेन्ट रोडचे बेड कॉकीट मध्ये माति मिश्रीत दगड, मुरूम टाकला जात आहे. तर हे काम लपवण्यासाठी दगडाची चुरी सिमेन्ट मध्ये मिसळून बोगस रोडवर अर्धा इंच पातळ थर टाकण्याची काम हे ठेकेदार करत आहेत सदर कामे दर्जेदार व्हावीतं व जनतेची असुविध निर्माण होऊ नये शासनाचा निधी व्यर्थ जाऊ नये म्हंणुन नगर पालिकेच्या अधिकारी यांच्या अधिपत्या खाली कामे दर्जेदार व्हावीत अशी अपेक्षा सरकाची असते परंतु येथील सर्व अधिकारी हे ठेकेदार चे हस्तक असल्यामुळे ही कामे निकृष्ट व बोगस दर्जाची होत आहेत ही कामे तात्काळ थांबवण्यात यावी व या या कामाची  क्वालीटी कंट्रोल मार्फत तपासणी करण्यात यावी व  ठेकेदारांच्या खात्याची निहाय चौकशी करून त्यांच्यावर  फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे त्याचा अहवाल आल्याशिवाय संबंधीताचे बिल अदा करू नये याकरिता पीपल्स रिपब्लिकन पार्टी पूर्णा च्या महिला तालुकाध्यक्ष लक्ष्मीबाई जोगदंड यांच्या वतीने नगर परिषद प्रशासनासह जिल्हाधिकारी आंचल गौयल यांना निवेदन देण्यात आले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या