🌟पालम तालुक्यातील सिरसम येथे शितल साठें व सचिन माळी यांचा नवयान महाजलसा...!


🌟विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त नवयान महाजलसा कार्यक्रमाचे आयोजन🌟

पालम (दि.२१ एप्रिल) - पालम तालुक्यातील सिरसम (पा) येथे विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी शनिवारी रात्री ८.०० वा. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत,प्रबोधनकार तथा शाहीर शितल साठे आणि सचिन माळी यांचा बुद्ध,भीम गीतांचा प्रबोधनात्मक नवयान महाजलसा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


        यावेळी डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाची सुरूवात सकाळी ९.३० वा. श्री.प्रदिपजी काकडे यांच्या हस्ते पंचशिल ध्वजारोहन तर प्रथम सत्राच्या कार्यक्रमाचे उदघाटन मा.आमदार डाॅ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. महावंदना व अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.अनिताताई भगवान पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.आ.सिताराम घनदाट(मामा), मा.खा.सुरेशराव जाधव, श्री.संतोषभाऊ मुरकुटे, बाबासाहेब कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

सायंकाळी ४.०० वाजता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक व अभिवादन रॅली काढण्यात येणार असून भीम जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या  कार्यक्रमास व महाजलसा कार्यक्रमास परिसरातील महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नामदेव वाघमारे, जनार्दन वाघमारे, सखाराम वाघमारे, राजू वाघमारे, कैलास वाघमारे, श्रीकांत वाघमारे, दोलत वाघमारे, सचिन वाघमारे यांच्यासह संघर्ष मित्र मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या