🌟मुंबई येथील स्मृतिशेष शामराव गिरीधर वानखेडे यांच्या स्मरणार्थ बेघर निवारा केंद्र येथे फळ व बिस्कीट वाटप...!


🌟प्रमोद वानखेडे यांच्या वतीने फळ व बिस्कीटांचे वाटप🌟


परभणी (दि.३० एप्रिल) - मुंबई येथील स्मृतिशेष शामराव गिरीधर वानखेडे यांच्या स्मरणार्थ प्रमोद वानखेडे यांच्या वतीने सिद्धार्थ सोशल फाऊंडेशन मुंबई चे संस्थापक अध्यक्ष संतोष धबाले, परभणी शहरातील समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठान परभणी व रुग्णहक्क संरक्षण समिती परभणी यांच्या सहकार्याने आज दिनांक 30 एप्रिल रोजी परभणी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील, बेघर निवारा केंद्र येथे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप बनकर, शेख सरफराज यांच्या हस्ते केळी, चिकू, आणि बिस्कीट चे वाटप करण्यात आले. 

या वेळी समाजहित अभियान प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे, राज्य प्रसिध्दी प्रमुख शेख अझहर, भिमा कोरेगाव मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप वायवळ, रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, उपाध्यक्ष शेख सरफराज, सिद्धार्थ गायकवाड, विनोद वाडेकर, दीपक बनसोडे, प्रकाश अंभोरे, वैभव गायकवाड, जनहित शहर स्तर संघच्या अध्यक्षा संगीता सूर्यवंशी, उपाध्यक्ष रंजना गायकवाड, सचिव वैशाला धामगुळे आदींची उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या