🌟परभणीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनासाठी अभूतपूर्व गर्दी....!


🌟प्रशासकीय अधिकारी/कर्मचारी/लोकप्रतिनिधी पक्ष पदाधिकाऱ्यांसह जनसागराने ही केले महामानवास अभिवादन🌟  


परभणी (दि.१४ एप्रिल) - भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती १३२ व्या जयंती निमित्त आज शुक्रवार दि.१४ एप्रिल रोजी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पुर्णाकृती पुतळ्यासमोर मान्यवरांसह हजारो नागरिकांनी अभिवादना करिता  अभुतपूर्व गर्दी केली.जिल्हाधिकारी सौ.आंचल गोयल,जिल्हा पोलीस अधिक्षक रागसुधा आर.महापालिका आयुक्त सौ.तृप्ती सांडभोर यांनी महसूल,पोलीस व महापालिका प्रशासनाद्वारे या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले .यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रताप काळे,निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडजकर आदी उपस्थित होते.


तत्पूर्वी भारतीय बौद्ध महासभेद्वारे या परिसरात बुद्धवंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यास हजारो नागरिक उपस्थित होते. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत विविध पक्ष, संस्था, संघटना, प्रतिष्ठानच्या मान्यवरांसह अन्य पदाधिकारी व सदस्यांनी, सर्वसामान्य नागरिकांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत भावपूर्ण अभिवादन केले. यावेळी खा.संजय जाधव,खा.फौजिया खान,आ.सूरेश वरपूडकर, जेष्ठ नेते विजय वाकोडे,आ.डाँ.राहुल पाटील, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे, डॉ. विजय गायकवाड, ज्येष्ठ नेते डी. एन. दाभाडे, यूवा नेते अजयराव गव्हाणे,जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके,रविराज देशमुख,श्रीमती राणूबाई वायवळ,भीमराव वायवळ, ज्येष्ठ नेते बीएच सहजराव, बाळासाहेब देशमुख, डॉ. राजगोपाल कालानी, आकाश लहाने, रणजीत मकरंद,मुंजाजी गोरे,सिद्धार्थ कसारे,सुधीर साळवे,सुशील देशमुख, डॉ. सुनील जाधव, रवी पतंगे,डॉ.संजय खिल्लारे, राहुल वायवळ, शंकर आजेगावकर, गौतम भराडे, गौतम मुंडे, राजकुमार जाधव, यशवंत मकरंद,आदींची आवर्जून उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या