🌟पुर्णेत शासकीय स्वस्त धान्याच्या काळ्या कारभाराला पुरवठा विभागाचा हिरवा कंदील ?


🌟असंख्य शिधापत्रीका धारकांना स्वस्त धान्य वितरीत न करता स्वस्त धान्य दुकानदारांकडून परस्पर काळ्या बाजारात विक्री🌟

पुर्णा (दि.२४ मार्च) - पुर्णा तालुक्यात शासकीय स्वस्त धान्याचा काळा कारभार थांबता थांबत नसून शासकीय स्वस्त धान्याची साठवण करणारे शासकीय गोदाम शहराबाहेरील पुर्णा-पांगरा ढोणे रोडवर असल्यामुळे गोदामातून शासकीय माल भरुन निघालेली स्वस्त धान्य वाहतूक करणारी वाहन परस्पर पुर्णा-पांगरा ढोणे-डाखोरे वाई-चुडावा मार्गाने नांदेड,किंवा पिंपळगाव-सोन्ना-कावलगाव-नाळेश्वर नांदेड,पांगरा ढोणे-हिवरा-वसमत किंवा पांगरा ढोणे-लहाण लोण मार्गाने वसमत-हिंगोली,हयातनगर-शिरड शहापूर-हिंगोली,पांगरा ढोणे-खुजडा-मिरखेल मार्गे परभणी अश्या चोरट्या मार्गाना पोलिस प्रशासनाला हुलकावनी देऊन या शासकीय स्वस्त धान्याची काळ्या बाजारात विल्हेवाट लावण्याचा गंभीर प्रकार होत असून या धान्य काळ्या बाजाराला शासकीय स्वस्त धान्य लिपीक,गोदाम रक्षक,महसुल सहाय्यक,पुरवठा अधिकारी यांचे देखील सहकार्य मिळत असल्याचे दस्तुरखुद्द स्वस्त धान्य वितरण प्रणालीतील काही दुकानदारांतूनच बोलले जात आहे.

---------------------------------------------------------------------

🔴पुर्णा शहरासह तालुक्यातील प्रत्येक स्वस्त धान्य दुकानां समोर शिधा पत्रिकाधारकांसमक्ष पुरवठा विभागाने करावे चावडी वाचन :-

पुर्णा शहरातील १५ शासकीय स्वस्त धान्य दुकानांसह तालुक्यात एकून ११५ शासकीय स्वस्त धान्य दुकान असून संबंधित स्वस्त धान्य दुकानदार प्रत्येक महिन्याला १५ तारखे अगोदर शिधा पत्रिका धारकांना स्वस्त धान्याचे वितरण करण्यास टाळाटाळ करून जाणीवपूर्वक या महिन्यातील स्वस्त धान्य पुढील महिन्यात देण्याचे आश्वासन देऊन त्यांना आशेवर ठेवून त्यांचे थम घेऊन त्यांना धान्य देण्यास टाळाटाळ करीत या स्वस्त धान्याची परस्पर काळ्या बाजारात विक्री करीत असल्याचे देखील निदर्शनास येत आहे त्यामुळे ग्रामपंचायतीं प्रमाणे स्वस्त धान्य शिधा पत्रिकाधारकांचे देखील चावडी वाचन झाल्यास स्वस्त धान्य वितरण प्रणालीत आणखी सुधार होईल

-----------------------------------------------------------------------

पुर्णा तालुक्यात एकून ११५ शासकीय स्वस्त धान्याची दुकान असून यात ग्रामीण भागात १०० तर शहरी भागातील १५ शासकीय स्वस्त धान्य दुकानांचा समावेश आहे संबंधित दुकांद्वारे गोरगरीब/रोजमजूर/शेतमजूर/अपंग/दारिद्रय रेषेखालील शिधापत्रीका धारकांना अंत्योदय,प्राधान्य तसेच अन्य योजने अंतर्गत धान्य पुरवठा केला जातो अंत्योदय योजनेतील प्रती शिधा पत्रिका धारकांना पुरवठा अधिकारी कोकाटे यांच्या म्हणण्याप्रमाणे गहू १५ किलो तर तांदूळ २० किलो तर साखर ०१ किलो असे वितरण केले जाते परंतु मागील पाच/सहा महिण्यापासून आधार शेडींगच्या नावावर शिधापत्रिका धारकांची दिशाभूल करीत हजारो शिधापत्रिका धारकांना शासकीय स्वस्त धान्यापासून वंचित ठेवून त्यांच्या मालाची परस्पर विल्हेवाट लावण्याचा गंभीर प्रकार केला जात असून शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांना वितरीत केल्या जाणारा साठा संबंधित दुकानदार परस्पर गोदाम रक्षकांच्या स्वाधीन करून तुरळक साठा आपआपल्या दुकानांमध्ये नेऊन मोजक्या शिधापत्रिका धारकांना वितरीत करुन उर्वरीत शिधापत्रिका धारकांना तुम्हाला पुढील महिन्यात एकदाच तुमच्या हिस्याचे धान्य मिळेल तुम्ही ई-पॉस मशीनवर अंगठा लावा असे म्हणून शिधापत्रिका धारकांचा अंगठा घेऊन त्यांना प्रत्येक महिन्याला आशेवर ठेवून त्यांच्या हिस्याचा धान्यसाठा शासकीय स्वस्त धान्य तस्कर माफियांच्या घश्यात घालण्याचा भयंकर घाट संबंधित स्वस्त धान्य दुकानदार पुरवठा विभागातील भ्रष्ट अधिकारी/कर्मचारी करीत असल्याचे निदर्शनास येत असून प्रती महिना शेकंडो टन शासकीय स्वस्त धान्य काळ्याबाजारात विक्री केल्या जात आहे.

पुर्णा-पांगरा ढोणे रोडवरील शासकीय स्वस्त धान्य गोदामातून अगदी सहजपणे चोरट्या मार्गाने अर्थात मधल्या मार्गाने नांदेड-हिंगोली-परभणीला नेऊन काळ्या बाजारात विकता येत असल्यामुळे हा शासकीय स्वस्त धान्याचा काळा बाजार अत्यंत सुरळीतपणे चालत असून संबंधित गोदामावरील येणाऱ्या जाणाऱ्या मार्गावर जाणीवपूर्वक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाही याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे स्वस्त धान्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लावलेले जिपिएस देखील बंद करण्यात येतात त्यामुळे सदरील वाहन धान्याचा साठी नियोजित ठिकाणी पोहोचतवतात की काळ्याबाजारात घेऊन जातात याचा कुठल्याही प्रकारचा थांगपत्ता लागत नाही शहरासह ग्रामीण भागातील शासकीय स्वस्त धान्य दुकानदार आपली धान्य साठा १२ तारीख ते १५ तारखेपर्यंत उचलतात परंतु सदरील धान्य साठा शिधापत्रिका धारकांना जाणीवपूर्वक पुढील तारखे पर्यंत वाटप करीत नाहीत व उरलेला साठा देखील परस्पर काळ्याबाजारात विक्री करून उर्वरीत शिधापत्रिका धारकांना पुढील महिन्यात देण्याचे आश्वासन देऊन त्यांचे ई-पॉस मशीनवर अंगठे घेऊन शासनासह शिधापत्रिका धारकांची देखील फसवणूक करीत असल्याचे उघड होत आहे तर काही स्वस्त धान्य दुकानदार जाणीवपूर्वक दुकाळ बंद ठेवून उचललेला साठा गिळकृत करीत असल्याचे दिसत आहे.शासकीय स्वस्त धान्य काळ्या कारभारात शहरातील काही शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांचाही सहभाग असून शासकीय स्वस्त धान्य काळ्याकारभाराची सखोल चौकशी झाल्यास नांदेड येथील कृष्णूर येथे काही वर्षापुर्वी झालेल्या धान्य घोटाळ्यापेक्षाही मोठा धान्य घोटाळा झाल्याचे उघड होईल असे मत जनसामान्यांतून व्यक्त होत आहे...

🌟शासनाने गुडीपाडवा भिमजयंतीसह रमजान ईद या सनांसाठी 'आनंदाचा शिधा' वाटपाची केलेली घोषणा ठरली फोल :-

महाराष्ट्र शासनाने गुडी पाडवा भिम जयंती महोत्सव तसेच रमजान ईद या सनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला 'आनंदाचा शिधा' ज्यात १ किलो साखर,१ किलो रवा,१ किलो गोडतेल,१ किलो चनादाळ आदींचे वाटप करण्यात येणार होते परंतु गुडी पाडवा सनाला जवळपास पंधरा दिवसाचा कालावधी उलटत असतांना देखील शिधा पत्रिका धारकांपर्यंत आनंदाचा शिधा काही पोहोचलेला नाही त्यामुळे हिंदु धर्मियांच्या आनंदावर विरजन पडले तरी निदान अन्य धर्मियांच्या आनंदावर विरजन पडणार नाही याची काळजी परभणी जिल्हा पुरवठा विभागाने घेतलेली बरी असे स्पष्ट मत जनसामान्यांतून व्यक्त होतांना दिसत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या