🌟पाथरी येथील मानवी हक्क अभियान तालुका कार्यालयात आज एकल महिलांच्या बचत गटाचे प्रशिक्षण संपन्न....!


🌟यावेळी महात्मा फुले व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून प्रशिक्षण शिबिरास सुरुवात🌟


परभणी (दि.15 एप्रिल) - परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील मानवी हक्क अभियान तालुका कार्यालयात आज शनिवार दि.15 एप्रिल 2023 रोजी एकल महिलांच्या बचत गटाचे प्रशिक्षण घेण्यात आले यावेळी पाथरी पोलीस स्टेशन येथील दामिनी पथकाच्या प्रमुख संगीता वाघमारे या उपस्थित होत्या यावेळी महात्मा ज्योतिबा फुले व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून प्रशिक्षण शिबिरास सुरुवात करण्यात आली.


या प्रशिक्षण शिबिरात चे प्रमुख सावित्रीमाई एकल महिला संघटनेचे प्रमुख रघुनाथ कसबे हे उपस्थित होते यावेळी मानवी हक्क अभियानाचे जेष्ठ कार्यकर्ते तथा शाहीर डंबाळे मामा तसेच मानवी हक्क अभियानाचे पाथरी तालुका अध्यक्ष भीमाशंकर वैराळे, मानवी हक्क अभियान शहराध्यक्ष उत्तम झिंजुर्डे, सावित्रीमाई एकल महिला संघटनेच्या पाथरी तालुकाध्यक्ष उषाताई यादव या उपस्थित होत्या 

यावेळी संगीताताई वाघमारे यांनी बचत गटाविषयी सखोल असे मार्गदर्शन करून सावित्रीमाई एकल महिला संघटनेचे प्रमुख रघुनाथ कसबे यांनी खेळाच्या माध्यमातून बचतीचे महत्त्व पटवून दिले या कार्यक्रमाच्या वेळी एक्शन एड कडून स्वाती पितळे यांना शिलाई मशीनचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले एकल महिला बचत गटाच्या प्रशिक्षण शिबिरास प्रत्येक गावातून प्रत्येक गटाच्या अध्यक्ष आणि सचिव यांनी उपस्थिती दर्शवली हा प्रशिक्षण शिबिराचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावित्रीमाई एकल महिला संघटनेचे पात्री तालुका समन्वयक गोटू भाऊ गिराम यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या