🌟परभणी जिल्हाधिकारी गोयल यांच्या आदेशाची अद्याप अंमलबजावणी नाही ? गायरान जमिनीचा शोध लागता लागेना...!


🌟पुर्णेतील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या जागेचा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यातच ?🌟

परभणी/पुर्णा (दि.०४ एप्रिल) - परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी पुर्णा शहरात उपलब्ध असलेल्या सर्वे नंबर १४ या १९ हेक्टर १४ आर या जागेतील भुखंड तहसिलदार व उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय यांना १६ डिसेंबर २०२२ रोजी लेखी स्वरुपात जा.क्र.२०२९/आरबी/डेस्क/एलएनडी-१/कावी-४१२ आदेश जारी करीत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासह पुर्णा पोलिस स्थानकाच्या भव्य इमारतीसाठी जागा उपलब्द करुन देण्याचे निर्देश दिले होते.

जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी जारी केलेल्या आदेशाला जवळपास चार महिने उलटत असतांना देखील तहसिल प्रशासनासह उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयाची शोध मोहीम संपलेली दिसून येत नाही पुर्णा शहरातील अत्यंत महत्वाच्या मध्यभागात उच्चभ्रू वसाहतींच्या आसपास तब्बल १९ हेक्टर १४ आर शासकीय गायरान जमिनीतील बरीत जमीन उपलब्ध असतांना देखील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासह पौलिस स्थानकाच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध होत कशी नाही ? असा प्रश्न उपस्थित होत असून या सर्वे नंबर १४ या कोट्ट्यावधी रुपयांच्या शासकीय गायरान जमीनीचा मोठा भाग नगर परिषदेतील भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांनी भु-माफियांशी आर्थिक हितसंबंध जोपासत बोगस कागदपत्रांच्या आधारे चोरांच्या घषात घातल्याचे निदर्शनास येत असून अन्य सर्वे नंबर मधील जागांच्या बोगस रजिष्ट्र्या करुन या रजिष्ट्र्यांच्या आधारे त्यांना सर्वे नंबर १४ मधील गायरान जमिनीवर बांधकाम परवाने बहाल करण्यात आल्याने या गायरान जमिनींवर टोलेजंग इमारती उभारल्या गेल्यामुळेच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासह पोलिस स्थानकाच्या इमारतीचा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यातच असल्याचे बोलले जात आहे.  

पुर्णेच्या पुर्व तहसिलदार पल्लवी टेमकर एसडीएम सुधिर पाटील यांच्या उपस्थितीत अधिक्षक भुमिलेख शेख यांनी जिल्हाधिकारी गोयल यांच्या आदेशाप्रमाणे मागील महिन्यात जागेची मोजनी केली खरी परंतु अहवाल मात्र जिल्हा प्रशासनास अद्यापही पाठवण्यात आला नसल्याचे समजते त्यामुळे स्थानिक प्रशासनाची निष्क्रियता यातून उघड होत आहे......  टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या