🌟पहिल्या नॅशनल फेडरेशन गतका कप मध्ये महाराष्ट्र टीमला फेयर प्ले अवार्ड....!


🌟महाराष्ट्राचे सचिव पांडुरंग अंभुंरे यांचा सन्मान🌟 

परभणी (दि.२६ एप्रिल) : चंदिगड येथे राष्ट्रीय पातळीवर झालेल्या पहिल्या नॅशनल फेडरेशन गतका कप मध्ये महाराष्ट्राच्या टीमने फेअर प्ले अवार्ड प्राप्त केल्याबद्दल, नॅशनल गतका असोसिएशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष हरजितसिंग गरेवाल यांनी महाराष्ट्राचे सचिव पांडुरंग अंभुरे यांना सन्मानित केले आहे.


वर्ड गतका फेडरेशन यांच्या मान्यतेने व नॅशनल गतका असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे चंदिगड येथील स्पोर्ट काॅम्प्लेक्स मध्ये दि 21 ते 23 एप्रिल 2023 पर्यंत आयोजित केलेल्या पहिल्या फेडरेशन गतका कप मध्ये देशाच्या 13 राज्यामधून सहभागी झालेल्या 300 खेळाडूंमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या फेडरेशन गतका कप मध्ये महाराष्ट्र टीमला फेअर प्ले अवॉर्ड मिळाल्याबद्दल गतका असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव पांडुरंग ज्ञानदेव अंभुरे यांना नॅशनल गतका असोसिएशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष हर्जितसिंग गरेवाल यांच्या हस्ते फेअर प्ले अवार्ड, सन्मान चिन्ह,शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पंजाब युनिव्हर्सिटीचे खेल निर्दशक डॉक्टर दलविंदर सिंह ,चंदीगड  प्रशासन चे संयुक्त निदर्शक डॉक्टर सुनील रॉय आणि चंदिगड ऑलम्पिकचे महासचिव एन. एस. ठाकूर हे मान्यवर उपस्थित होते. 

पहिल्या फेडरेशन गतका कप मध्ये महाराष्ट्र टीमचे मॅनेजर अप्पासाहेब चिंचकर व महाराष्ट्र टीम मधील सहभागी मुली खेळाडू  कुसुम चव्हाण, वृषाली मनुरे, ऐश्वर्या राऊत, सृष्टी अंभुरे, धनश्री कुलकर्णी, मुस्कान गायकवाड, निकिता स्वामी, प्रतीक्षा राजपूत, अश्विनी देवकर, अक्षता स्वामी. मुले खेळाडू मनीष लिंबोरे, सुरज कामूर्ती, भूषण चलानी, तेजस देशमुख, जय पाठरे, गणेश पाटोळे, आर्यन राऊत, अजय जाखड, हर्षद जाधव यांनी सहभाग नोंदवला. 

महाराष्ट्र टीमला प्ले अवॉर्ड मिळाल्याबद्दल विकी नरवानी, मंदार कुलकर्णी, दत्ता गरुड, सूर्यकांत मोगल, विश्वनाथ तिखे, सुरेश कदम, नारायण कदम, मदन कोल्हे यांनी महाराष्ट्र टीमसोबतच महाराष्ट्र सचिव पांडुरंग अंभुरे यांचेअभिनंदन केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या