🌟भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमत्त डॉ.भालचंद्र सार्वजनिक वाचनालयात अभिवादन....!


🌟महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले अभिवादन🌟 

परळी वैजनाथ (दि.१४ एप्रिल) :- परळीतील डॉ.भालचंद्र सार्वजनिक वाचनालय येथे भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून तमाम भारतीयांना त्यांचे हक्क आणि अधिकार बहाल करणाऱ्या, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या, महामानव,प्रज्ञासूर्य,विश्वरत्न,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

          शहरातील नगर परिषद,परळी वैद्यनाथ व राज्य मराठी विकास मुबंई अंतर्गत डॉ.भालचंद्र सार्वजनिक वाचनालय येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नगर परिषदचे मुख्यधिकारी त्रिबक कांबळे व कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून अमर देशमुख सर व प्रमुख अतिथी म्हणून  पत्रकार प्रा. प्रविण फुटके सर उपस्थित होते .या कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अमर देशमुख सर यांनी केआजची युवा पिढी,उच्च शिक्षित चळवळीची लाभार्थी असलेली मंडळी ही चळवळीपासून दूर जात आहे.तर तुलनेने कमी शिकलेला सर्वसामान्य माणूस चळवळ चालवत आहे. त्यांना इतिहासाची जाण व भान करून देणे गरजेचे आहे.फक्त बाबासाहेबांच्या विचारांचा जयघोष करून चालणार नाही. तर त्या विचाराच्या दिशेने पुढे गेले पाहिजे. असे मार्गदर्शन अमर देशमुख सर यांनी केले. तर डॉ. भालचंद्र सार्वजनिक वाचनालयचे श्री जगतकर म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐवढी ग्रंथ कोणीही लिहिले नाहीत. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत समजुउन्नतीसाठी काम केले.  कधीच त्यांनी धन सम्पतीचा मोह ठेवला नाही. फक्त ग्रंथ लिहिणे व पुस्तकावर प्रेम केले. त्यांनी एक स्वतःसाठी महाल न बांधता पुस्तकासाठी महाल बांधला असल्याचे त्यांनी सांगितले. 

          या कार्यक्रमास अमर देशमुख सर, पत्रकार प्रविण फुटके, सामाजिक कार्यकर्ते विजय गित्ते तसेच डॉ. भालचंद्र सार्वजनिक वाचनालयचे गंगाधर जगतकर, संजय हनुमंत जाधव, वजीर खान इसाक खान, भगवान काकडे, सौ. सविता बारड, महादेव गिते व इतर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर जगतकर यांनी केले तर आभार भगवान काकडे यांनी मानले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या