🌟परभणी तालुक्यातील वाडी दमई येथील मन्मथ स्वामी मंदिरासाठी जमीन दान...!


🌟गुडी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शिवचरण बिडकर पाटील यांनी मंदिरासाठी केली जमीन दान🌟

परभणी (दि.२३ मार्च) - तालुक्यातील वाडी दमई येथे काल बुधवार दि.२२ मार्च २०२३ रोजी मराठी नवीन वर्षाच्या गुडी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री शिवचरण काशिराव बिडकर पाटील यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ  मन्मथ स्वामी च्या मंदिरासाठी, तसेच  समाजाच्या सामाजिक कार्यक्रमासाठी भूमी दान केलेली आहे. 

 त्यांच्या सिंहाच्या वाट्यामुळे आज आपल्या वीरशैव समाजाला मन्मथ स्वामी च्या मंदिर उभारण्यासाठी खूप मोठं योगदान मिळालेला आहे. आपल्या सर्वांच्या भावनां चा सन्मान करून, 'मन्मथ स्वामी' बद्दलची आपुलकी, तसेच जागेची अडचण लक्षात घेऊन, सामाजिक कार्यासाठी होणारी अडचण  ,या सगळ्या बाबींचा विचार करून सामाजिक ध्याने प्रेरित असलेले शिवचरण बिडकर यांनी त्यांच्या आई वडिलांच्या कृपा आशीर्वादाने, मन्मथ स्वामी च्या कृपाशीर्वादाने भूमिदान करण्याचा जो निर्णय घेतला. त्यानिमित्त शिवचरण बीडकर , नागेश महाराज विभुते यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले यावेळी बहुसंख्येने वीरशैव लिंगायत बाधव ग्रामस्थ उपस्थित होते.

या त्यांच्या निर्णयामुळे समाजामध्ये आनंदात  वातावरण निर्माण झालेला आहे. "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले "या उक्तीप्रमाणे त्यांनी आज कार्य केलेला आहे. "कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरित वाटे देवा "या प्रमाणे त्यांनी  आई वडिलांचे नावलौकिक केलेले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या