🌟बुलढाणा जिल्हा महिला मराठा सोयरीक संघाच्या अध्यक्षपदी श्रीमती सुरेखाताई सोमनाथ सावळे यांची निवड....!


🌟श्रीमती सुरेखा सावळे ह्या उच्चशिक्षित असून त्या बीए बीएड आहेत🌟

✍️मोहन चौकेकर 

बुलडाणा (दि.२५ मार्च) : बुलडाणा येथे दि.०२ एप्रिलला गर्दे वाचनालयात संपन्न होणाऱ्या नियोजित वधू-वर परिचय मेळाव्याच्या  अनुषंगाने, बुलढाणा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या तसेच शिवराणा साप्ताहिकाच्या मुख्य संपादिका श्रीमती सुरेखा सोमनाथ सावळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत, महाराष्ट्र मराठा सोयरीकने त्यांच्या खांद्यावर बुलढाणा जिल्हा महिला सोयरीक संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे

श्रीमती सुरेखा सावळे ह्या उच्चशिक्षित असून त्या बीए बीएड आहेत. त्यांचे यजमान स्वर्गीय सोमनाथजी सावळे हे संपूर्ण जिल्ह्याला परिचित असलेले नाव पत्रकारितेच्या क्षेत्रात स्व. सोमनाथजी सावळे यांचा मोठा दबदबा. श्रीमती सुरेखा सावळे यांना सामाजिक कार्याचे बाळकडू हे आपल्या वडिलांकडून आणि आजोबांकडूनच मिळाले आहे.  त्यांचे वडील  स्वर्गीय रामदासजी जाधव हे सामाजिक क्षेत्रात व राजकीय क्षेत्रात सदा अग्रणी राहिलेले आहेत. त्यांचे आजोबा कोलवड येथील स्वर्गीय टी.के.पाटील उपाख्य तोतारामजी जाधव सर हे त्या काळातील बुद्धीनिष्ठ, समाजाभिमुख आणि समर्थ व्यक्तिमत्त्व. श्रीमती सुरेखा सावळे ह्या मागील पाच वर्षांमध्ये महाराष्ट्र मराठा सोयरीक या संकल्पनेमध्ये कार्यरत आहेत.त्यांचा बुलढाणा जिल्ह्यामध्ये चांगला जनसंपर्क  असून त्याचा निश्चित दोन एप्रिलच्या मेळाव्याला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही.बुलढाणा येथे नियोजित दोन एप्रिलच्या मेळाव्याच्या पूर्वतयारीमध्ये सुद्धा त्यांचा मोठा सहभाग राहिलेला आहे .त्यांच्या नेतृत्वाखाली नियोजित बुलडाणा येथील मेळाव्यामध्ये महिलांचा मोठा सहभाग राहील. ही सर्व पार्श्वभूमी बघूनच त्यांची निवड ही निश्चितच सार्थ ठरते. रामराव पाटील, प्रा जगदेवराव बाहेकर, डॉ. मनोहर तुपकर , सुनील सपकाळ, दिनकरराव बावस्कर, अरविंदराव देशमुख  सतीशचंद्र रोठे, नारायणराव मिसाळ, रमेश बुरुकुल, गणेश राव निकम, अजय बिलारी,  डॉ.सौ संजीवनी शेळके, डॉ लता बाहेकर ,  वर्षा पालकर, नवनीता चव्हाण, अंजली देशमुख, अनिताताई शेळके,  प्रा डॉ प्रमोद शेळके  प्रा. रामदास शिंगणे  यांनी निवडीचे मनापासून स्वागत बुलढाणा नियोजन समितीतील सर्वच सदस्यांनी एकमताने केले आहे.

या व्यतिरिक्त समाजातील इतर सर्व स्तरातून त्यांच्या निवडीचे स्वागत व कौतुक होत आहे.महाराष्ट्र मराठा सोयरीकचे संस्थापक  श्री सुनीलराव जंजाळ पाटील यांनी पुष्पगुच्छ व नियुक्तीपत्र देऊन सुरेखाताई सावळे यांचा सत्कार केला. त्यांचा आगामी कार्यकाळ अतिशय प्रभावी ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.....

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या