🌟परभणीत स्वतः सहाय्यता महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तु मालांचे उद्या २४ मार्च पासून भव्य प्रदर्शन व विक्री...!


🌟हरिप्रसाद मंगल कार्यालय यशनिवार बाजार रोड मुख्य पोस्ट ऑफिस च्या बाजूला कार्यक्रमाचे आयोजन🌟


परभणी (दि.२३ मार्च) - आंतरराष्ट्रीय महिला दिन-०८ मार्च निमित्त परभणी येथील महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम ) मार्फत बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू व माला करिता भव्य प्रदर्शनाचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले आहे यात महिलांनी आपला सहभाग नोंदवावा व प्रदर्शनाला भेटी देण्याचे आवाहन श्री बाळासाहेब झिंजाडे जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय परभणी मार्फत महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी या दृष्टीने उद्या शुक्रवार दि.२४ मार्च ते २६ मार्च २०२३ या कालावधीत भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.


या प्रदर्शनास सहभागी होण्याचे महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) परभणीचे बाळासाहेब झिंजाडे जिल्हा समन्वय अधिकारी यांनी केले आहे. उद्या शुक्रवार दि.२४ मार्च ते २६ मार्च २०२३ या तिन दिवसांकरिता हरिप्रसाद मंगल कार्यालय शनिवार बाजार रोड मुख्य पोस्ट ऑफिस च्या बाजूला परभणी येथे आयोजित करण्यात आले आहे तीन दिवसीय प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणात स्टॉलची उभारणी करण्यात आली असून  विविध वस्तूंचे व मालाचे या प्रदर्शनास खऱ्या अर्थाने आकर्षण राहणार आहे तसेच खाद्यपदार्थांचे देखील स्टॉल या प्रदर्शनामध्ये असणार आहेत यामध्ये विविध प्रकारचे महिलांनी तयार केलेले घरगुती मसाले विविध प्रकारचे पापड लोणचे शेवया सांडगे कुरडी, लाल व काळे तिखट घाण्याचे करडी तेल विविध दुग्धजन्य पदार्थ खवा पेढा बासुंदी पनीर व तूप ज्वारी व बाजरीची भाकरी लाडू चिवडा लेमन ज्यूस विविध प्रकारच्या डाळी दुरडी झाडू रुखवताचे सामान  इत्यादी वस्तूंचे आकर्षण असणार आहे 

      आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तसेच आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्षानिमित्त या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील या प्रदर्शनात  करण्यात येणार आहे कामाच्या पहिल्या दिवशी बचत गटातील महिलांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यामध्ये आठ महिला उद्योजकांचा सन्मान होणार आहे नऊ महिला स्वयंसहायता बचत गटांचा उत्कृष्ट बँक लिंकेज साठी बचत गटांचा सत्कार करून सन्मानित करण्यात येणार आहे तसेच 8 लोकसंचलीत साधन केंद्राचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान करून गौरविण्यात येणार आहे तसेच विविध मान्यवर बचत गटातील महिलांना मार्गदर्शन करणार आहेत उद्घाटन कार्यक्रमाकरिता मा. श्रीमती आंचल गोयल (भा प्र से )जिल्हाधिकारी परभणी मा.आर रागसुधा (भा.पो.से) पोलीस अधीक्षक परभणी मा श्रीमती तृप्ती सांडभोर आयुक्त  महानगरपालिका परभणी मा.रश्मी खांडेकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी मा. श्री विजय लोखंडे कृषी अधीक्षक कृषी विभाग परभणी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. सुनील हटेकर जिल्हा अग्रणी व्यवस्थापक परभणी मा. सुनिल नवसारे  महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र परभणी मा.किशोर परदेशी जिल्हा नियोजन अधिकारी महाव्यवस्थापक नाबार्ड परभणी मा. सिद्धाराम माशाळे विभागीय सन नियंत्रण व मूल्यमापन अधिकारी मराठवाडा विभाग मा वि म माननीय लांडगे सचिव विधी सेवा प्राधिकरण जिल्हा व्यवस्थापक कौशल विकास मा. श्री यादव जिल्हा व्यवस्थापक  खादी ग्रामोद्योग महामंडळ परभणी मा. श्री प्रशांत भोसले वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा विभाग प्रमुख कृषी विज्ञान केंद्र परभणी हे मान्यवर प्रमुख  तसेच विविध विषयावरील परिसंवाद व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच दिनांक २६ मार्च २०२३ रोजी समारोपय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यामध्ये उत्कृष्ट स्टॉल मधील सहभागी घेतल्याबद्दल व उत्कृष्ट विक्री झाल्याबद्दल महिलांचा सन्मान करून गौरविण्यात येणार आहे तसेच सांग संस्कृती कार्यक्रमामधील विजेत्या महिलांचा व उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे जास्तीत जास्त परभणी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला व पुरुषांनी आपला सहभाग प्रत्यक्ष भेटून द्यावा असे आव्हान करण्यात आले आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या