🌟रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या मराठवाडा महिला प्रमुख पदी प्रीती जाधव यांची निवड....!


🌟समितीचे प्रमुख ॲड.विजय पंडित यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेण्यात आला🌟

लातुर (दि.१५ मार्च) महाष्ट्रातील एकमेव रुग्णांच्या न्याय,हक्क व संघर्षा साठी सदैव तत्पर असणारी महाराष्ट्रात रुग्णासाठी कार्य करणारी समिती म्हणून रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्रच्या मराठवाडा महिला प्रमुख पदी प्रीती जाधव यांची नियुक्ती समितीच्या महत्वपुर्ण बैठकित समितीचे प्रमुख ॲड.विजय पंडित यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेण्यात आला व सचिव विश्वासजी कुलकर्णी, उपाध्यक्ष संजयजी सुरवसे, महिला प्रमुख मिनाक्षी ताई शेटे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन व शाल पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यरत करण्यात आले या वेळी सहसचिव संतोष सोनवणे, सदस्य किरण काळे, महिला लातूर जिल्हा प्रमुख कल्पनाताई मोरे, सायरा पठाण, संजीवनी पटेल, आराध्या जोशी, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख गायत्री देबे, कल्पना जाधव,  प्रिया पवार, मीनाताई टेकाळे, प्रमोद चव्हाण, सचीन सुर्यवंशी, निलेश पाटील, ॲड महेश झीले, सदानंद मोरे यांनी अभिनंदन केले आहे. या निवडीबद्दल प्रीती जाधव यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या