🌟एचएआरसी संस्थेच्या आर्थिक सहयोगाने उभे राहिलेल्या 'माझं घर' प्रकल्पाचे लोकार्पण....!


🌟एचएआरसी संस्थेने मदतीतून वंचितांना मिळाला निवारा🌟 


परभणी (दि 19 मार्च 2023) - एचएआरसी संस्था, परभणी यांच्या आर्थिक सहयोगाने 'माझं घर' या प्रकल्पासाठी लातूर जिल्ह्यातील बुधोडा ता औसा येथे निवारा गृह उभारण्यात आले आहे. आज 19 मार्च रोजी याचा शुभारंभ व लोकार्पण झाला. या निवारा गृहासाठी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेने समाज माध्यमावर आवाहन केले होते ज्यास संपूर्ण महाराष्ट्रातून दात्यांनी दिलेल्या मदतीतून सात लाख 6 हजार रुपयांची मदत केली आहे.


एचएआरसी संस्थेने जून 2021 पासून या वंचित  बालकांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्यांना शिक्षण व पुनर्वसनासाठी वेळोवेळी गरजेनुसार सर्वतोपरी मदत केली आहे.फेब्रुवारी 2023 मध्ये माणूस प्रतिष्ठान संस्थेने त्याना वांगजेवाडी बुधोडा ता औसा जि लातूर येथे 1/- भाडेतत्त्वावर मिळालेल्या जमिनीवर 100 वंचित मुलांसाठी निवासी निवारा गृह उभारण्यासाठी एचएआरसी संस्थेला विनंती केली होती. तिथे 4 हजार square feet चा बहुउद्देशीय निवारा गृह उभा राहील जिथे या मुलांची निवारा ची सोय सोबत शिक्षणाचे धडे देता येईल.

या कार्यासाठी अंदाजे सात ते साडे सात लाख खर्च अपेक्षित होता.यासाठी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेने सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले होते. ज्यास दात्यांनी चांगला प्रतिसाद दिला. व यासाठी एचएआरसी संस्थेने सात लाख सहा रुपये डोनेशन मधून 4000 square feet इतका भव्य सर्व सुविधा युक्त निवारा गृह बांधून दिला.19 मार्च रविवारी रोजी या निवारा गृहाचे उद्घाटन प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ.विठ्ठल लहाने यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी समाजवादी नेते सुभाष भिंगे उपस्थित होते.यावेळी प्रा शिवा आयथळ, डॉ पवन चांडक, डॉ सौ आशा चांडक, ऍड चंद्रकांत राजुरे श्री राजेश्वर वासलवार श्री संजय महावलकर, श्री अर्जुन पवार, कलाशिक्षक पांडुरंग पाटणकर, समाजसेवक रवी बापटले, दत्ता बारगजे आदींची उपस्थिती होती. 


 या प्रसंगी माणूस प्रतिष्ठान संस्थे तर्फे सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन एचएआरसी संस्थेने दिलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली माझं घर चे प्रमुख श्री शरद झरे या प्रसंगी बोलताना म्हणाले की," एचएआरसीचे प्रमुख डॉ. पवन चांडक व दाते डॉ लीना बगाडीया यांच्या मदतीमुळे आमच्या निवारा गृहाचे काम जलद मार्गी लागले आहे. आजावर एचएआरसी संस्थे तर्फे सात लाख रुपयांची मदत झाली आहे. या निवारा गृहामुळे १०० बालकांच्या निवासाचा प्रश्न सुटणार आहे. मुलांचे निवास, शिक्षण तसेच बहुऊदेशीय सभागृह असाही उपयोग होणार आहे. या कामी सहकार्य केल्याबद्दल एचएआरसी संस्था, प्रकाशवाटा ग्रुपवरील सर्व दात्यांचे माणूस या संस्थेच्या वतीने शरद झरे यांनी आभार मानले."

याप्रसंगी बोलताना एचएआरसी संस्थेचे मार्गदर्शक प्रा शिवा आयथळ म्हणाले "या मुलांसाठी काम करतांना त्याना सहानभूती नको तर समानभूती पाहिजे पाहिजे. जेणेकरून ही मुले आत्मनिर्भर होऊन एक चांगले देशाचे नागरिक बनतील."या प्रसंगी डॉ पवन चांडक म्हणाले "शिक्षणापासून वंचित 100 बालकांसाठी हक्काचे घर व्हावे ही प्रा शिवा आयथळ सरांची इच्छा होती. म्हणून केलेल्या आवाहनास एचएआरसी संस्थेचे सदस्य व दाते यांनी दिलेल्या मदतीबद्दल आभारी आहे. विशेषतः मुंबई येथील डॉ लीना बगाडीया मॅडम, डॉ सतीश पंचधार, प्रा दिलीप राके, प्रा शिवा आयथळ, सत्यंजय हर्षे, शैलेश वट्टमवार, श्रीपाद हमदापुरकर, रवी मौर्य, सचिन त्यागी, मल्हार कुलकर्णी, मीनल मोहन, गणेश आहेर, डॉ महेश अवचट, राजेश्वर वासलवार, वासुदेवानंद प्रभू,  ऍड चंद्रकांत राजुरे, चंद्रकांत अमीलकंठवार, निहार मुळे आदी दात्यांचे मोलाचे सहकार्य लाभले"

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या