🌟समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने जनमित्र यशवंत मकरंद यांच्या वाढदिवसानिमित्त थंड पाणपोईचे आयोजन.....!


🌟या पाणपोई चे विद्रोही कवी जनमित्र यशवंत मकरंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले🌟

परभणी (दि.०४ मार्च) - परभणी शहरातील समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने विद्रोही कवी जनमित्र यशवंत मकरंद यांच्या वाढदिवसाच्या निमित्त वाढता उन्हाळा लक्षात घेऊन शहरातील गोर, गरीब, गरजू तहानलेल्या लोकांना थंड पाणी पिण्यासाठी थंड जारचे पाणी  परभणी शहरातील आय.टी.आय. कॉर्नर, डॉ. आंबेडकर नगर, जिंतूर रोड येथे आज दिनांक 3 मार्च 2023 रोजी आयोजन करण्यात आले आहे.

 या पाणपोई चे विद्रोही कवी जनमित्र यशवंत मकरंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी समाजहित अभियान प्रतिष्ठान च्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे यांनी यशवंत मकरंद यांना शाल व पुष्पहार घालून सत्कार करून अभियान च्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना जनमित्र यशवंत मकरंद यांनी समाजहित अभियान प्रतिष्ठान चे आभार मानले. त्याच बरोबर हाके साहेब, सुनिल ढवळे, प्रमोद अंभोरे, रमेश घनघाव यांनी सामोचित मनोगते व्यक्त केले. 

        यावेळी थंड पिण्याच्या पाण्याची पाणपोई गरजू लोकांच्या सेवेसाठी उन्हाळ्यातील तिन्ही महिने सुरु असणार असल्याची माहिती अभियान चे अध्यक्ष प्रमोद अंभोरे व सचिव जनसेवक रमेश घनघाव यांनी दिली. 

ही पाणपोई उभारणीसाठी समाजहित अभियान प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे, सचिव जनसेवक रमेश घनघाव, उपाध्यक्ष आकाश साखरे,  राज्य प्रसिध्दी प्रमुख शेख अझहर, दीपक बनसोडे, संदीप वायवळ, प्रेम तूपसमुंद्रे, मुज्जू भई चिचा, नसीर भई, सय्यद रफियोद्दीन, विनोद वाडेकर, हरजित सिंग बावरी, अभियानच्या महिला अध्यक्षा रमाताई घोंगडे, सरीताताई अंभोरे, प्रकाश अंभोरे, नारायण अंभोरे,  शुभम कोरडे, सविताताई घोगरे, वंदनाताई खिल्लारे, रेखाताई कांबळे, नसरीन बी, वंदना खिल्लारे, अक्षय नंद, बाबासाहेब स्वामी,विकास जमधाडे, अजय शिराळे,  आकाश राक्षे, अजय नंदपटेल,  शंकर बनसोडे, बंटी गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. 

    यावेळी सुनिल ढवळे, हाके साहेब, दिलीप बनकर, शेख सरफराज, अण्णा, सिनेकलावंत हाफिज उर रहेमान आदींची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या