🌟गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टें करताय भारतीय जनता पार्टीच्या खच्चीकरणाचे काम ?


🌟भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य संतोष मुरकुटे यांचा गंभीर आरोप : पालम बाजार समिती लढविणार असल्याचे संकेत🌟

पालम (दि.३१ मार्च) : राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या खच्चीकरणाचेच काम सातत्याने केले असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य संतोष मुरकूटे यांनी केला.

           पालम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून मुरकूटे यांनी शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचेच पॅनल प्रचंड बहुमताने विजय मिळवून बाजार समितीवर सत्ता राखेल, असा विश्‍वासही व्यक्त केला.

           राज्यात भाजप -शिवसेना युतीचे सरकार आहे. या सरकारमध्ये रासपा हा सहयोगी पक्ष आहे. परंतु, गंगाखेड मतदारसंघात आ.  गुट्टे यांनी मित्रपक्ष म्हणून भाजपाचा सन्मान राखण्याऐवजी वेळोवेळी भाजपाचेच खच्चीकरण करण्याचे काम आजपर्यंत सातत्याने केले आहे, अशी टिका केली. भाजपाच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना फंडाचे आमिष दाखवून रासपामध्ये प्रवेश करून घेतले. आता परस्परच सर्व प्रकारचा कारभार सुरु आहे. भाजपाच्या कोणत्याही पदाधिकार्‍यांना सन्मानाने बोलावून विकास कामात सहभागी करून घ्यावयाचे धारिष्ट्य गुट्टे यांच्यात नाही, अशी टिका मुरकुटे यांनी केली.

           मागील काळात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सत्ताधारी मंडळींनी काही विकासाची कामे केली नाहीत. बाजार समितीत पिण्याचे पाणी नाही, कर्मचार्‍यांचा पगार नाही, कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्‍यांना बसण्याची जागा नाही. अशा अनेक समस्यांच्या विळख्यात बाजार समिती अडकलेली आहे, असे स्पष्ट करीत मुरकुटे यांनी या समितीवर आता भाजप पूर्ण ताकदीनिशी विरोधकांशी लढत देवून आपला झेंडा फडकवेल, असा विश्‍वास मुरकूटे यांनी व्यक्त केला.

          यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विठ्ठल रबदडे, अ‍ॅड. व्यंकटराव तांदळे, भाजपाचे भागवत बाजगीर, जिल्हा उपाध्यक्ष लिंबाजी टोले, भाजपाचे पालम तालुकाध्यक्ष शिवाजीराव दिवटे, शिवसेनेचे  तालुका प्रमुख भाऊसाहेब पौळ, नगरसेवक लक्ष्मणराव रोकडे, युवाध्यक्ष नंदेश्‍वर बलोरे, तालुका सरचिटणीस भगवान करंजे, साहेबराव सुरनर, सूर्यकांत पळसकर, रुपेश शिनगारे, गोपाळ देवकते, सोपान कराळे, रोहिदास एम्बलवाड, सितार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या