🌟राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपुर्तीच्या पार्श्वभूमीवर गोवोगावी संघाच्या शाखा स्थापण करणार...!


🌟यासाठी स्वयंसेवकांनी पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संजय तालखेडकर यांनी व्यक्त केले🌟

पुर्णा (दि.२५ मार्च) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशात ६८ हजार गावी नित्य स्वरूपात संघाचे काम चालते येणाऱ्या काळात संघाला १०० वर्ष पूर्ण होत असल्याने एक लाख गावात संघाचे काम पोहोचण्याचे लक्ष आहे यासाठी स्वयंसेवकांनी पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संजय ताल खेडकर (परभणी) यांनी व्यक्त केले पूर्णा येथे वर्ष प्रतिपदा उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गुलाबराव इंगोले हे होते व्यासपीठावर प्रवीण आंबोरे उपस्थित होते तालखेडकर म्हणाले समाजासाठी काम करायचे असेल याचे उत्तम उदाहरण पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांचे चरित्र आहे संघ मोठा झाला ९८ वर्षाची संघपरंपरा संघ विश्वव्यापी झाला ज्या ज्या ठिकाणी हिंदू समाज तिथपर्यंत संघ पोहोचला डॉक्टर हेडगेवार यांनी बीज रूपाने संघ स्थापन केला आज संघाला येत्या  2025 रोजी शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने एक लाख गावात संघ काम पोहोचवण्याची लक्ष आहे. आज संघ देशाच्या केंद्रस्थानी आहे कुठल्याही निमित्ताने संघाचे स्मरण होते. संघ समाज जीवनाचा केंद्रस्थानी आलेला आहे असे ते म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविकव  पाहुण्यांचा परिचय प्रवीण आंबोरे यांनी करून दिला अमृत वचन सतीश बंडे पद्य हर्षल महाजन सूत्रसंचालन दिलीप पवार तर आभार रमण ओझा यांनी केले.

🌟पुर्णा शहरात आयोजित संघाच्या संचनाला प्रतिसाद......

पुर्णा शहरातील ज्ञानेश्वर विद्यामंदिर या ठिकाणाहून संघ स्वयंसेवकांचे पथसंंचालन काढण्यात आले  महाराणा प्रताप चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक ,महावीर चौक स्वातंत्र्यवीर सावरकर चौक या मार्गावरून गणवेश धारी सेवकांचे पथसंचलन काढण्यात आले येथील जैन मंदिर परिसरात या पथसंचलनाचे विसर्जन करण्यात आले यावेळी संजय तालखेड यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या