🌟ओबीसींच्या जनजागृती व एकजुटीसाठी प्रबोधन मंडल यात्रा....!


🌟परभणी जिल्ह्यातील सर्व तालुके आणि त्या मार्गावरील मोठ्या गावावरून जाणार प्रबोधन मंडल यात्रा🌟

ओबीसी आरक्षणाच्या हक्कासाठी काही दिवसापूर्वी परभणी येथे काढण्यात आलेल्या भव्य ओबीसी मोर्चाला जिल्ह्यातील तमाम ओबीसी एक समाजाने अतिशय भरभरून प्रतिसाद दिला होता.त्या सगळ्या अक्रोशाचे फलीत म्हणुन आपले राजकीय आरक्षण आपल्याला पुन्हा परत मिळाले आहे परंतू त्यासाठी नेमण्यात आलेल्या बाटीया आयोगाने नोंदविलेल्या निष्कर्षात आणि गांव पातळीवर माहिती संकलित करणाऱ्या यंत्रनेच्या हातुन जाणीवपूर्वक काही चुका करण्यात आल्या आहेत त्यामुळे ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात कमी दाखवण्यात आली आहे. परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत ओबीसींच्या जागांना फटका बसला आहे. त्याच बरोबर ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा ही गेल्या कित्येक दिवसाची आपली मागणी आहे परंतू शासन जाणीवपूर्वक त्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.

जो पर्यंत आपण आपल्या मागण्यांसंदर्भात उग्र होणार नाहीत तोपर्यंत शासन व्यवस्था आपली हेळसांड थांबवणार नाही त्यासाठी आधी आपल्यातील विखुरलेल्या शक्तीला एकत्र करून परस्परात एकजुटीची भावना निर्माण करुन खालील जिव्हाळ्यांच्या मागण्यांसंदर्भात आपल्या ओबीसी बांधवात जनजागृती करावी या उदात्त हेतूने ही प्रबोधन मंडल यात्रा काढण्यात आली आहे.सदर मंडल यात्रा परभणी जिल्ह्यातील सर्व तालुके आणि त्या मार्गावरील मोठ्या गावावरून जाणार आहे. ही यात्रा परभणी जिल्ह्यातील ओबीसी चळवळीच्या इतिहासातील अविस्मरणीय यात्रा ठरणार आहे. त्यामुळे आपण दि.01 मार्च 2023 रोजी सायंकाळी 04-30 वाजेच्या सुमारास टी पॉइंट, झिरो फाटा - नांदेड रोड, पूर्णा या ठिकाणापैकी जवळच्या असणाऱ्या ठिकाणी आपल्या ओबीसी बांधवासह मोठ्या संख्येने जमावे असे आवाहन पुर्णा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष डॉ.संजय लोलगे,शहराध्यक्ष शेख अहमद शेख मस्तान यांनी केले आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या