💥बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत शिवजयंती महोत्सवाची जय्यत तयारी....!

                       


                       💥चिखलीत शिवजयंती निमित्त दि.17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन💥

✍️ मोहन चौकेकर 

चिखली  :  लोक कल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  जयंती  निमीत्त चिखली येथे अनेक  वर्षापासून सर्व राजकीय पक्ष, सर्व सामाजीक संघटना, गणेश ऊत्सव मंडळ, दुर्गा ऊत्सव मंडळ, सर्व व्यापारी संघटना, मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी शिवभक्त शिवजयंती ऊत्सव समीतीच्या वतीने  विविध कार्यक्रमाचे आयोजन करन्यात येत असते. मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली नव्हती. मात्र यावर्षी चिखली शहरात 393 वी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. दि.17 फेब्रूवारी ते 19 फेब्रूवारी 2023 पर्यंत सलग तिन दिवस भरगच्च विविध कार्यक्रमाचे आयोजन शिवभक्त शिवजयंती ऊत्सव समीतीव्दारे करण्यात आले आहे.

  दि.17 फेब्रूवारी वार शुक्रवार रोजी, सकाळी 10 ते दुपारी 3 वाजे पर्यंत  आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते या वेळी शैकडो जणांनी रक्तदान केले तर हजारो नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. दि.18 फेब्रूवारी शनीवार रोजी, सकाळी 11 ते 1 वाजे पर्यंत महाशिवरात्री निमीत्त फराळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला.  सायंकाळी 7 वा, हभप सौ. सुनंदाताई भोस ( झिंजाड, रा. श्रीगोंदा जि. अ. नगर ) किर्तनकार, शिवचरीत्रकार, प्रवचनकार यांचा किर्तनाचा कार्यक्रम,

दि. 18 फेब्रवारी रात्री 12 वा नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर फटाक्यांची भव्य आतिषबाजी, दि.19 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 वा अभिषेक आणि महापुजा, त्यानंतर सकाळी 11 वाजता महिलांची भव्य मोटरसायकल रॅली, त्यानंतर दुपारी 2 वाजता भव्य शोभायात्रा खामगाव चौफुली येथून सुरु होणारआहे. असे भव्यदिव्य कार्यक्रमाचे शिवभक्त शिवजयंती ऊत्सव समीती चिखलीच्या वतीने आयोजीत करण्यात आले आहे. तरी या सर्व कार्यक्रमाचा सर्व जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन शिवभक्त शिवजयंती ऊत्सव समीती चिखलीच्या वतीने करण्यात आले आहे.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या