🌟पुर्णेतील श्री गुरू बुध्दीस्वामी महाविद्यालयात "केंद्रीय अर्थसंकल्प" या विषयावर भित्तीपत्रक प्रदर्शन....!


🌟यावर्षी देखील बी कॉम द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी युनियन बजेट 2023 या विषयावर पोस्टर प्रेझेंटेशन केले🌟 

पूर्णा (दि.२८ फेब्रुवारी) येथील श्री गुरू बुध्दीस्वामी महाविद्यालयातील  वाणिज्य विभागा मार्फत प्रत्येक वर्षी "केंद्रीय अर्थसंकल्प" या विषयावर पोस्टर प्रेसेंटेशन चे आयोजन केले जाते यावर्षी देखील बी कॉम द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी युनियन बजेट 2023 या विषयावर पोस्टर प्रेझेंटेशन केले 

        यावेळी कार्यक्रमाला उद्घाटक  म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के राजकुमार, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. संजय दळवी, आणि प्रा. शेख फतेमा यांची उपस्थती होती 

           महाविद्यालयातील विद्यार्थांनी  पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये सक्रिय सहभाग घेतला वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. दिशा मोरे, डॉ स्मिता जमधाडे आणि प्रा उदगीरकर राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बीकॉम द्वितीय वर्षाच्या कदम अंजली, रेणुका कदम, काबलीये कुमुद, निशिगंधा कदम, ढोणे अश्विनी, नेहा गायकवाड, निकिता मोहिते, प्रतीक्षा कदम, गीता कदम,  वैष्णवी दुधाटे यांनी सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या पोस्टर प्रेझेंटेश केले विद्यार्थिनींनी तयार केलेले पोस्टर्स आकर्षक, सुंदर, सुटसुटीत,असून ज्ञानात भर टाकणारे आहे असे मत उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल वाणिज्य विभागाचे कौतुक केले 

     या कार्यक्रमास  डॉ.वर्षा धुतमल प्रा. असोरे बालाजी, डॉ. सोमनाथ गुंजकर आणि खातून मॅडम यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मचारी मंचक वळसे विशेषतः कालिदास वैद्य आणि वाणिज्य विभागातील विद्यार्थी दीपक शेळके ,ज्ञानदेव शिंदे ,देसाई गजानन, अर्जुन कदम वैभव बोकारे रुक्मिणी कदम रेणुका ,कदम दिपाली, सूर्यवंशी, सुषमा नरखडे ,प्रियंका गुंडे .शुभांगी भाकरे यांनी विशेष प्रयत्न केले यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या