🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईनौस - मागील चोविस तासातील महत्वाच्या अपडेट/ हेडलाईन्स/बातम्या......!


🌟लोकसभा निवडणुकासाठी AIMIM लढवणार औरंगाबादसह इतरही जागा - असदुद्दीन ओवैसी

 ✍️ मोहन चौकेकर

* भारत जोडोसह माझाही प्रवास संपला ; सोनिया गांधीची राजकारणातुन निवृतीचे संकेत ?

* जी-20 मध्ये राजकारण आणू नका:ते विकासाला खोडा घातल्यासारखे होईल,सहकार मंत्री अतुल सावे यांचे विरोधकांना आवाहन

* वर्ल्ड कप खेळायला भारतात जाणार नाही; पाकिस्तानी खेळाडूची BCCI ला धमकी

* येत्या चार पाच वर्षात भारत ही जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल - केंद्रीय मंत्री पियुष गोयल

* नाशिक महानगरपालिकेत आमचा पक्ष 22 जागा लढवेल - रामदास आठवले

* आम्ही आधीच श्रीमंत असलेल्या परदेशी संस्थांना देणगी देतो - अनुपम खेर

* मुंबईत मध्यरात्रीपासून  दोन दिवसांचा मेगाब्लॉक

* आगामी काळात भारतही चीनप्रमाणे कारखाना म्हणून विकसीत होईल- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

* लोकसभा निवडणुकासाठी AIMIM लढवणार औरंगाबादसह इतरही जागा - असदुद्दीन ओवैसी

* पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला, निसिथ प्रामाणिक यांच्या ताफ्यावर कुचबिहार येथे अज्ञातांनी केली दगडफेक

* तुर्कीत पुन्हा भुकंप, भुकंपाची तिव्रता 5.3 रिश्टर स्केल एवढी; सर्वात आधी झालेल्या भूकंपात आतापर्यंत 50 हजारहून अधिक मृत्यू

* विद्यार्थ्यांच्या वाहनांना भीषण अपघात; अमरावतीत ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात 22 विद्यार्थी जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

* इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने रचला मोठा विक्रम, कसोटीतील दुसऱ्या डावात 231 विकेट्स घेत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम केला आपल्या नावावर

* नाशिक शहरात धावणार इलेक्ट्रिक बस, नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची 25 इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यास प्रशासकीय मंजुरी 

* एकरभर कांद्यावर रोटाव्हेटर, कांद्याचे दर पडल्याने अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील नागापूर येथील शेतकऱ्याचा उत्पादन खर्च न निघाल्याने शेतकऱ्याचा प्रकार

* बिग बॉस उपविजेता शिव ठाकरेने घेतली राज ठाकरेंची भेट, अभिनंदन करून शाबासकी देण्यासाठी राज ठाकरे यांनी पाठवलं होतं खास आमंत्रण

* छत्तीसगडमध्ये चकमकीत एका सहायक उपनिरीक्षकासह 3 जवान शहीद, छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झाली चकमक

* RBI ची छत्रपती संभाजीनगरमधील / औरंगाबाद आदर्श महिला नागरी सहकारी बँक व अकलूज येथील शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेवर कारवाई

* जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ भारतात दाखल: पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, 6 पारंपारिक पाणबुड्या बनवण्याच्या करारावर करणार स्वाक्षरी

* फेब्रुवारीतच 'मे'सारखा उन्हाळा, पुढील 3 दिवसांत कमाल तापमानात 2 अंश सेल्सिअसची वाढ होण्याचा अंदाज; मार्चमध्ये पारा चाळीशीपार जाण्याचा अंदाज 

* अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मीचा 'सेल्फी' सिनेमा पहिल्याच दिवशी आपटला, सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त 3 कोटींची केली कमाई

* अदानींची 33 व्या क्रमांकावर घसरण: गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत 33 व्या क्रमांकावर घसरले, सध्या एकूण संपत्ती 35.3 अब्ज डॉलर्स एवढी

* सोन्याचे दर: मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे दर प्रती 10 ग्रॅम 56180 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचे दर 51500 रुपये प्रति 10 ग्रॅम

* टी-20 वर्ल्डकप: महिला टी-20 वर्ल्डकपचा फायनल सामना उद्या (26 फेब्रुवारी), दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार लढत 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या