🌟परभणी जिल्हा संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षाची आढावा बैठक संपन्न....!


🌟बैठकीस उपस्थित असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा संपर्क प्रमुख श्री प्रवीणभाऊ हेंडवे यांनी मार्गदर्शन केले🌟 

परभणी - प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा संपर्क प्रमुख श्री. प्रविणभाऊ हेंडवे यांनी काल पक्षाच्या जिल्हा संपर्क कार्यालयात जिल्ह्यातील सर्व तालुका प्रमुख व मुख्य पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. माजी राज्यमंत्री मा.आ.बच्चुभाऊ कडू यांनी नागपूर हिवाळी अधिवेशना दरम्यान पालघरात राहणाऱ्या भटक्या विमुक्त जातीच्या व आदिवासी  लोकांना हक्काचे घर मिळावे या साठी नागपूर येथे मोठे आंदोलन केले होते. त्या आंदोलनाची दाखल राज्य सरकारने घेतली असून महाराष्ट्रात गावा शेजारी पाल उभी करून राहणाऱ्या भटक्या विमुक्त जाती व आदिवासी लोकांची रीतसर नोंद घेण्याची काम प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते या नोंदणी चे काम करत आहेत. या सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा संपर्क प्रमुख श्री. प्रविणभाऊ हेंडवे हे परभणी जिल्हा दौऱ्यावर आले होते या वेळी त्यांनी संघटनेतील कार्यकाळ संपलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या बाबत ही सूचना केल्या.

महाराष्ट्रतील प्रत्येक गावात पाल घरात राहणाऱ्या भटक्या विमुक्त जाती व आदिवासी लोकांच्या नोंदी एकत्र करून हि संपूर्ण माहिती राज्य शासनाकडे सादर करून या लोकाना हक्काचे घर मिळावे या साठी मा.आ. बच्चुभाऊ कडू यांच्या वतीने प्रयत्न केले जाणार आहेत.

बैठकीस उपस्थित असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा संपर्क प्रमुख श्री प्रवीणभाऊ हेंडवे यांनी मार्गदर्शन केले व नोंदणी बाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. बैठकीस जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पण मार्गदर्शन केले व जिल्ह्यात पाल घरात राहणाऱ्या कुटुंबाच्या नोंदीचे कागदपत्र पक्षाकडे सादर केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचलन महिला आघाडी शहर चिटणीस ॲड. सुवर्णा देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन शहर प्रमुख धर्मेंद्र तुपसमुद्रे यांनी केले. कार्यक्रमाला प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके पाटील, धर्मेंद्र तुपसमुद्रे, ॲड. सुवर्णा देशमुख, संजय वाघमारे, अंकुश गिरी, पिंटू कदम, नकुल होगे, वैभव संघई, शंकर दामोदर, माधव सूर्यवंशी, आगलावे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या