💥पुर्णेत पहाट उजाडताच अपघातांच्या मालिकेला सुरुवात : तिन अपघातात दोघांचा मृत्यू तर तिघे जखमी....!


💥पुर्णा-ताडकळस मार्गावर एका ५८ वर्षीय इसमाचा तर पुर्णा-नांदेड लोहमार्गावर २८ वर्षीय युवकाचा मृत्यू💥 


पुर्णा (दि.०८ फेब्रुवारी) - पुर्णा तालुक्यात आज बुधवार दि.०८ फेब्रुवारी २०२३ ची पहाट उजाडताच अक्षरशः अपघातांच्या मालिकेला सुरुवात झाली प्रथमतः सकाळी १०-०० ते १०-१५ वाजेच्या सुमारास पुर्णा-ताडकळस महामार्गावरील कानडखेड शिवारातील पुर्णा नदीवर असलेल्या बॉम्बे पुलालगत दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाल्यामुळे या भयंकर अपघातात तालुक्यातील पांगरा ढोणे येथील ५८ वर्षीय हभप.रावसाहेब महाराज मुंजाजी ढोणे यांचा जागेवरच मृत्यू झाला या घटनेत त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या मुलासह समोरासमोर धडक दिलेला दुचाकीस्वार देखील गंभीर जख्मी झाला.


यानंतर पुर्णा-ताडकळस मार्गावर सकाळी दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघाताच्या ठिकाणी पुन्हा आज बुधवार दि.०८ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ०२-०० ते ०२-१५ वाजेच्या सुमारास एका प्लेटीना दुचाकी स्वाराचा अपघात झाल्याने सदरील अनोळखी दुचाकीस्वार गंभीर जख्मी झाला या दुचाकीचा क्रमांक एम.एस २६ व्हिएच ६५३२ असा असुन सदरील व्यक्ती कुठली राहणारी आहे याचा तपास लागलेला नाही तर यानंतर पुन्हा आज बुधवार दि.०८ जानेवारी रोजी सकाळी १०-०० वाजेच्या सुमारास पुर्णा-नांदेड लोहमार्गावरील हिंगोली गेट समोरील आडगाव(ला)-बरबडी शिवारातून जाणाऱ्या लोहमार्गावर नांदेड येथून पुर्णेकडे येणाऱ्या रेल्वेची धडक लागल्यामुळे तालुक्यातील भिमनगर नावकी येथील २८ वर्षीय गौतम जगन्नाथ राऊत याचा लोहमार्ग मैल क्रमांक ३२१/३ या ठिकाणी जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे आज बुधवार दि.०८ फेब्रुवारीची पहाट पुर्णेकरांसाठी अक्षरशः अपघातांची मालिकाच घेऊन आल्याचे दिसत असून आज लगातार झालेल्या तिन अपघातात दोघांचा मृत्यू तर तिघे जण जखमी झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


दरम्यान पुर्णा तालुक्यातील पुर्णा-चुडावा-नांदेड,पुर्णा-ताडकळस,पुर्णा-झिरोफाटा-परभणी या महामार्गावर सातत्याने अपघातांच्या मालिका घडत असून या मार्गावरून सुसाट वेगाने धावणारी दुचाकी/तिनचाकी/चारचाकी वाहनांसह टिप्पर/हायवा/माल ट्रक/आयशर टेम्पो आदी अनियंत्रित वाहन अपघातांना कारणीभूत ठरत असून संबंधित मार्ग अत्यंत धोकादायक ठरत असल्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या