💥बुलढाण्यात आ.संजय गायकवाड यांनी शिंदे गटाला शिवसेना नावासह धनुष्य बाण चिन्ह मिळाल्याबद्दल केला मोठ्ठा जल्लोष...!


💥हा विजय लोकशाहीचा विजय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा विजय 'शिवसेनेचा' - आ.संजय गायकवाड ✍️ मोहन चौकेकर 

बुलढाणा: केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जो महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.त्यानुसार शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह सध्याच्या बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे  यांच्या गटाला मिळाले.

त्यानिमित्ताने बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आ. धर्मवीर  संजुभाऊ गायकवाड यांचे जयस्तंभ चौक येथील शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे धर्मवीर आमदार  संजुभाऊ गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये भव्य जल्लोष सोहळा साजरा करण्यात आला, यावेळी सोबत युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, युवासेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड, धर्मवीर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड, माजी नगरसेवक श्री आशिष जाधव, गोविंदा खुमकर, सचिन गायकवाड, मल्हारी गायकवाड,मा. पंचायत समिती सदस्य अमोल तायडे,नितीन राजपूत, जीवन उबरहंडे, शाम पवार, निलेश पाटील, शंकर जाधव, विजय काळवाघे,प्रवीण निमकर्डे, मारुती कोल्हे, संजय तोटे, विष्णू मामा मुळे,देवानंद दांडगे,प्रवीण वाघलव्हाळे, दीपक तुपकर,ज्ञानेश्वर खांडवे, सचिन कोठाळे, सुनील भाकरे, कुलदीप गावंडे, श्रीकृष्णा शिंदे,हर्षल पायगव्हाण,तुषार राजपुत, महेश ढोरे, सनी पवार, आकाश सोनुने, यांच्यासह बुलडाणा शहरातील सर्व शिवसेना, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते....!

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या