💥नांदेड येथील हुजूर साहीब सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी उपाध्यक्ष इंदरजीतसिंघ गल्लीवाले यांचे दुःखद निधन...!💥त्यांच्या पश्च्यात कुटुंबामध्ये पत्नी,दोन मुलं,सून,तीन मुली,जावाई, नाटवंड,भाऊ असा मोठा परिवार💥 

नांदेड (दि.05 फेब्रुवारी) :  गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व माजी नगरसेवक स. इंदरजीतसिंघ गल्लीवाले यांचे रविवारी सकाळी 7.30 सुमारास आजारपणामुळे निधन झाले. शेवटच्या त्यांचे वय 74 वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी 4.30 वाजता नगीनाघाट शमशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येत प्रतिष्ठित नागरिक व नातेवाईक उपस्थित होते. त्यांच्या पश्च्यात कुटुंबामध्ये पत्नी, दोन मुलं, सून, तीन मुली, जावाई, नाटवंड, भाऊ असा मोठा परिवार शोकाकुल झाला आहे. 

स. इंदरजीत सिंघ गल्लीवाले यांची जवळपास 50 वर्षाची कारकीर्द होती त्यात राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र आणि गुरुद्वारा बोर्डाचे राजकारण प्रमुख होते. ते दोन वेळेस गुरुद्वारा बोर्डाचे सदस्य होते त्यात सन 1991 मध्ये ते उपाध्यक्ष म्हणून नियुक्त झाले होते. त्यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री स्व. शंकररावजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनात नांदेड कांग्रेस शहर अध्यक्ष म्हणून काही काळ कार्य केले होते. त्यांच्या निधानामुळे शीख समाज एका अग्रेसर नेत्यास मुकला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या