💥परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड शहरातील गोदावरी नदी पात्रातून आढळली शिवलिंगाची मूर्ती....!


💥भाविकांनी तात्काळ धाव घेवून शिवलिंग मूर्ती बाहेर काढून केली मनोभावे पूजा💥

परभणी (दि.०६ फेब्रुवारी) : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरातील गोदावरी नदीच्या पात्रातील पुलाजवळ भगवान शिवलिंगाची अखीव-रेखीव अशी सुंदर मूर्ती आढळून आल्याने भाविकांनी एकच गर्दी केली यावेळी भाविकांनी तात्काळ धाव घेवून मूर्ती नदीपात्रातून बाहेर काढली व या शिवलिंगाच्या मुर्तीची विधिवत मनोभावे पूजा केली.

              गंगाखेड येथील राजेंद्रपेठ गल्लीतील सौ.गंगाबाई माणिकराव टाक या गोदावरी नदीच्या पात्रात पूजेच्या निमित्ताने नित्यनियमाप्रमाणे आल्या होत्या. त्यावेळी पात्रात शिवलिंगाची मूर्ती आढळली. लगेचच सौ. टाक यांनी त्या संबंधीची कल्पना परिचितांना दिली. भोलानाथ मित्र मंडळाच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी तात्काळ धाव घेवून नदीपात्रातील शिवलिंगाची ही आखीव रेखीव मूर्ती भोलेनाथाचा जयघोष करीत बाहेर काढली व राजेंद्र पेठ गल्लीतील गणपती मंदिरात ही मूर्ती नेवून ठेवली. मनोभावे पूजा केली. दरम्यान, महाशिवरात्रीच्या दिवशी या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या