🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या.....!


🌟 राज्य सरकारी कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर🌟

 ✍️ मोहन चौकेकर

*  मोठी बातमी : औरंगाबाद नाव झाले आता ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे झाले ‘धाराशिव’; नामकरणाला केंद्राची मंजुरी

* उद्धव ठाकरे यांची मोठी रणनीती, ‘मातोश्री’वर मोठ्या घडामोडी

* अलिबागमधील 19 बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरे पुन्हा अडचणीत ? तत्कालीन ग्रामपंचायत सदस्यांसह सात जणांवर गुन्हा 

* राज्य सरकारी कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर

* पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या; शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांचा रोड शो, अजित पवारही मैदानात, रविवारी मतदान

* पुन्हा एकदा नसीरुद्दीन शाहांनी केलं वादग्रस्त विधान

* शक्तीप्रदर्शन, घरोघरी भेटी अन् प्रचारयात्रा; शेवटच्या दिवशी चिंचवडमध्ये तीनही उमेदवारांकडून प्रचाराचा धुराळा तर चिंचवडमध्ये 14 लाखांची रोकड जप्त 

* सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्वाळा; 21 मार्चपर्यंत आमदारांच्या नियुक्त्या करता येणार नाहीत, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टातली केस आणखी लांबणीवर

* सुमंगलम लोकोत्सव सुरू असतानाच कणेरी मठात 10 ते 12 जनावरांचा संशयास्पद मृत्यू; मृत गायींचा आकडा वाढण्याची भीती  

* महिलांच्या टी 20 वर्ल्डकपमधील भारताचं फायनलचं स्वप्न भंगलं, ऑस्ट्रेलियाचा पाच धावांनी विजय, आम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न केले, पण... सेमीफायनल्समधील पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीतनं व्यक्त केली खंत

* नाना पटोलेंना पदावरून हटवून त्यांच्या जागी शिवाजीराव मोघेंना नवे अध्यक्ष करण्याची 24 काँग्रेस नेत्यांची मागणी

* गुजरातमध्ये जया बच्चन, जुही चावलासह अनेक सेलेब्जच्या नावे बनावट कोविड-19 लस प्रमाणपत्रे जारी; चौकशीचे आदेश

* ‘मेटा’ पुन्हा एकदा करणार कर्मचाऱ्यांची कपात, 11 हजार लोकांना कामावरुन कमी करणार

* पंचमहाभूत महामंगल सोहळ्याला गालबोट; 50-52 गायींचा मृत्यू; शिळ्या अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज

* सरकार कायम विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

* देशाचे कृषी बजेट 1.25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी

* औरंगाबाद फुटबॉल लीग:अरब बॉईजचा अजय क्लबवर दणदणीत विजय, विजय चौधरी व सय्यद जुनैद उत्कृष्ट खेळाडू ठरले

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना जोरदार टोला:म्हणाले - कृष्णेच्या काठावर प्रायश्चित्त घेण्याची वेळ आमच्यावर आली नाही

* राज्यसरकारी कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर, जुनी पेन्शन योजनेसह 8 प्रमुख मागण्यांसाठी संप

* देशाच्या पहिल्या महिला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती माजी आमदार देविसिंह शेखावत यांचे पुण्यात निधन

* फास्ट अँड फ्युरियस फ्रँचायझीच्या 10व्या भागाने रिलीज होण्यापूर्वीच केला विक्रम, रिलीजच्या तीन महिने आधीच अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू

* आदिवासी भागातील आरोग्यकर्मींचे वेतन वाढवणार, स्पीड बोटच्या सहाय्याने नर्मदा काठावरील गावांना आरोग्य सुविधा देणार - मंत्री डॉ. विजयकुमार गावित

* राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची निवड 21 मार्चपर्यंत नाहीच; सुप्रीम कोर्टात या प्रकरणी 21 मार्च रोजी सुनावणी होणार

* कटुता संपवायचा चेंडू फडणवीसांच्या कोर्टात: संजय राऊत म्हणाले - तुम्ही पुढाकार घ्या; शिवसेनेच्या पाठीत भाजपने खंजीर खुपसल्याचा आरोप

* राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ, अनंत करमुसे मारहाण प्रकरणाची चौकशी पुढे सुरू ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

* राज्य सरकारी कर्मचारी 14 मार्चपासून बेमुदत संपावर, जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी कर्मचारी संपावर जाणार 

* कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा राजकारणातून निवृत्त; म्हणाले - निवडणूक लढणार नसलो तरी राजकारणात सक्रिय राहणार

* सुप्रीम कोर्टाचा मेन्स्ट्रुअल लीव्हवर सुनावणी करण्यास नकार; CJI म्हणाले - एम्प्लॉयर्सना सुट्टी देण्याची सक्ती केली, तर ते महिलांना काम देणे टाळतील

* स्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स इंदौर कसोटी खेळणार नाही, उपकर्णधार स्टीव्ह स्मिथकडे जबाबदारी; 3री कसोटी 1 मार्चला

* माजी आमदार देवीसिंह शेखावत यांचे 89व्या वर्षी निधन, पुण्यातील केईएम रुग्णालयात त्यांच्यावर सुरू होते उपचार; आज सायंकाळी अंत्यसंस्कार

* फास्ट अँड फ्युरियस चित्रपट: 10व्या भागाने रिलीज होण्यापूर्वीच केला विक्रम, रिलीजच्या तीन महिने आधीच अ‍ॅडव्हान्स बुकिंग, चित्रपट 19 मे ला रिलीज होणार

* पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 26 तारखेला मतदान होणार, आज संध्याकाळी 5 वाजेनंतर प्रचाराच्या तोफा थंडावल्या 

* शेअर मार्केटमध्ये घसरण: सेन्सेक्स 141 अंकांच्या घसरणीसह 59,463.93 वर बंद, निफ्टी 45 अंकांच्या घसरणीसह 17,465.80 वर बंद

* सोन्याचे दर:  मुंबईत आज 24 कॅरेट प्रती 10 ग्रॅम सोने 56510 रुपयांना तर 22 कॅरेट सोन्याचे दर 51700 रुपये प्रति 10 ग्रॅम 

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या