🌟मंगरुळपीर येथे कबड्डीच्या जंगी सामन्यांचा रंगला खेळ.....!


🌟कबड्डीच्या सामन्याचे उद्घाटन डॉ.सिद्धार्थ देवळे यांच्या हस्ते मान्यवराच्या उपस्थित पार पडले🌟

फुलचंद भगत

वाशिम:-मंगरूळपीर स्थानिक शिवनेरी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन वाशीम येथील सुप्रसिद्ध डॉक्टर सिद्धार्थ देवळे  व शिवसेना सह संपर्कप्रमुख विवेक नाकाडे, शिवसेना शहरप्रमुख सचिन परळीकर  णी शेकडो मान्यवराच्या उपस्थितीत करण्यात आले.


या निमित्य कबड्डीच्या सामन्याचे आयोजन करन्यात आले होते. तसेच कबड्डीच्या सामन्याचे उद्घाटन डॉ. सिद्धार्थ देवळे हस्ते व मान्यवराच्या उपस्थित पार पडले. शिवजयंती निमित्त आयोजित कबड्डी सामन्यात एकूण 16 संघाने भाग घेतला.त्यामध्ये प्रथम पारितोषिक  21 हजार रुपये वाशिम जिल्हा कबड्डी असोसिएशन यांनी पटकाविले. दुसरे पारितोषिक पंधरा हजार रुपये राजे छत्रपती संभाजी महाराज क्रीडा मंडळ हीरंगी. तिसऱ्या क्रमांकाची पारितोषिक 11000 रुपये तराळा क्रीडा संघाने पटकवले. चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक 7000 रुपये नवनाथ क्रीडा मंडळ मसोला यांनी पटकाविले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन भाष्कर मुळे आणी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती शिवनेरी चौक मंगरूळपीर यांनी केले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या