💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/बातम्या.....!


💥भारताचा चीनला मोठा धक्का : चिनी अ‍ॅप्सवर घातली बंदी💥

✍️ मोहन चौकेकर

* कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उद्या अर्ज भरणार नाना पटोलेंची मोठी घोषणा, टिळकांना डावललंय, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रस्तावाला काहीही अर्थ नाही असंही केलं स्पष्ट

 * पुणे पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धडपड; शरद पवारांसह मविआच्या नेत्यांना शिंदेंचे फोन.

* भारताचा चीनला मोठा धक्का अ‍ॅप्सवर घातली बंदी.

* पुणे पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत; निवडणूक बिनविरोध व्हावी असं सर्वपक्षीयांना केलं आवाहन. 

* कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत वंचित आधी शिवसेनेची भूमिका काय ते पाहणार, शिवसेना त्या जागांवर लढणार असेल तर नक्कीच आमचं समर्थन असेल प्रकाश आंबेडकरांचं स्पष्ट वक्तव्य.

* ज्या विद्यापीठाचे नाव 'शिवाजी विद्यापीठ' त्या ठिकाणी अशा व्यक्तीला बोलवणे चुकीचे,राज्यपालांच्या कोल्हापूर दौऱ्याला शिवसेनेचा विरोध.

* कोल्हापूर,मिरज,सांगली,सातारा रेल्वे स्थानकांचा अमृत भारत योजनेतून पुनर्विकास होणार.

* 'अबकी बार किसान सरकार' ! KCR यांचं महाराष्ट्रात जोरदार  शक्तीप्रदर्शन.

* भारत-अमेरिकेच्या मैत्रीचं आणखी एक उदाहरण; ISRO आणि NASA चं संयुक्त अभियान, निसार सॅटेलाईट भारतात पोहोचणार.

* सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र.

* कोणीतरी माझ्यावर पाळत ठेवतंय.. आलीया - रणबीरवर कंगनाने केला गंभीर आरोप.

* अदानी समूहाविरोधात 6 फेब्रुवारीला देशव्यापी आंदोलनाची काँग्रेसकडून घोषणा.

* पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज, 12 फेब्रुवारीला खेळवला जाणार रोमांचक सामना.

* इन्फोसिसमध्ये कर्मचारी कपात; मूल्यमापन चाचणीत अनुत्तीर्ण झाल्याने 600 जणांना गमवावी लागली नोकरी.

* केंद्र सरकारची मोठी कारवाई! मनी लाँड्रिंगप्रकरणी चायनीजसह 232 परदेशी ॲप्स ब्लॉक.

* पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन, दुबईच्या रुग्णालयात अखेरचा श्वास.

* वर्धा जिल्हयात सावंगीमेघे इथ कॅथलॅब,जॉइंट रिप्लेसमेंट सेंटरचं उद्घाटन.

* महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाची विजय सलामी; बिहारवर सहा गुणांनी मात

* दि.रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आग सर्व कागदपत्रे जळाली.

* ठाकरे गटाच्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी ;ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत स्वत: नितीन देशमुख यांनी माहिती दिली.

* बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 1000 रुपये देण्याचे आश्वासन. 

* ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कांग्रेस पक्षाने त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये तृणमूलने 2 लाख नोकऱ्या, चौथी ते आठवी इयत्तेत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 1000 रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे.

* दिपक आत्राम यांचा भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश.

* तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची महाराष्ट्रात मोर्चेबांधणी सुरु त्यापार्श्वभूमीवर माजी आमदार दीपक आत्राम यांनी केसीआर यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला.

* गौतमी पाटीलची राजकारणात एन्ट्री करणार नाही. 

* गौतमी पाटीलने राजकारणात एन्ट्री करणार यावर भाष्य केलं. “राजकरणात माझी एंट्री होणार नाही. मला अजिबात त्यात रस नाही माझे जे चालू आहे तेच मी पुढे सुरु ठेवणार आहे. इतर कोणतीही गोष्ट मी करणार नाही.

* चीनवर पुन्हा डिजिटल स्ट्राईक; १३८ बेटिंग आणि ९४ कर्ज देणाऱ्या ॲप्सवर बंदी, डाऊनलोड करण्यापासून सावध व्हा.

* ऑनलाईन जुगार आणि स्वस्त व्याजदरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून लूट करणाऱ्या ॲप्सवर मोदी सरकारची बंदी.

* सोलापूर : मुलीला घटस्फोट दिल्याने हवालदार सासऱ्याने केला जावयाचा खून.

* नितीन अनिल पतंगराव (वय २७, रा. हुच्चेश्वरनगर, कुमठा नाका, सोलापूर) असे खून झालेल्या जावयाचे नाव आहे.

* पुणे विद्यार्थी गृहात गोंधळ, ४० जणांविरोधात गुन्हा.

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या