🌟मंगरूळपीर शहरातील मरिमाता मंदिराजवळील होत असलेली अनावश्यक गर्दी हटवण्याची मागणी...!


🌟लेखी निवेदनाव्दारे मागणी कवठळ येथील मा.सरपंच चंद्रशेखर प्रमोद भगत यांनी प्रशासनाकडे केली आहे🌟

मंगरूळपीर :- मंगरुळपीर शहरात असलेल्या मरिमाता मंदिरात दर शनिवारी बाजारच्या दिवशी लोकांची प्रचंड गर्दी असते.या गर्दीमुळे नाहक ञास सहन करावा लागत असल्याने सबंधित प्रशासनाने दर शनिवारी होत असलेली ही गर्दी होवू नये यासाठी ऊपाययोजना करण्याची लेखी निवेदनाव्दारे मागणी कवठळ येथील मा.सरपंच चंद्रशेखर प्रमोद भगत यांनी प्रशासनाकडे केली आहे.

         मंगरुळपीर शहरातील मानोरा चौकालगतच्या जुन्या याञा मैदान परिसरातल्या मरिमाता मंदिराजवळ दर शनिवारी बाजारच्या दिवशी दिवसभर लोकांची प्रचंड गर्दी असते.सदर गर्दीत प्रामुख्याने वरली लावुन आकडा येण्याची वाट पाहणारांची संख्या अधिक असते असा आरोप निवेदनकर्त्याने केला आहे.सदर ठिकाणी सावली असुन बसण्यासाठी जागाही ऊपलब्ध आहे. त्यामुळे आठवडी बाजारच्या दिवशी लोक तिथे गर्दी करतात.यामुळे लोकांना तिथुन जाणेयेणेस मोठा ञास सहन करावा लागतो.खिसेकापुही त्या गर्दीचा फायदा घेवुन हात साफ केल्याच्या घटना घडल्याचे समजते.बरेच लोक मंदिरातही दारू,गांजा पिवुन बसत असल्याने भाविक भितिपोटी मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाण्यास धजावत नाहित.बर्‍याचवेळी तिथे वाद ऊद्भऊन भांडणेही होतात.त्यामुळे सबंधित प्रशासनाने त्वरीत तिथे होणारी गर्दी हटवुन अवैध धंदे होणार नाहीत यासाठी अटकाव करावा जेनेकरुन लोकांना ञास होणार नाही अशी मागणी मा.सरपंच चंद्रशेखर भगत यांनी केली आहे.मागणी मान्य न झाल्यास ऊपोषणाचाही इशारा निवेदनाव्दारे प्रशासनाला देण्यात आला आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या