💥पुर्णेतील रेल्वेची सर्वच कार्यालयांसह नियोजित इलेक्ट्रिक लोको शेडही पळवणाऱ्यांच्या विरोधात उद्या पुर्णेकरांचा यल्गार...!


💥 दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील प्रांत/भाषा वादाचे विष पेरणाऱ्या अधिकारी व असंतुष्ट राजकारण्यांनी लावली पुर्णेला राख ?💥


परभणी/पुर्णा (दि.०७ फेब्रुवारी) - मराठवाड्यातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन म्हणून नावारुपाला आलेले पुर्णा  जंक्शन भौगोलिक व प्रशासकीय दृष्ट्या मध्यवर्ती केंद्र असल्यामुळे अत्यंत महत्वाचे रेल्वे जंक्शन असतांना देखील दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील प्रांतवाद/भाषावादाचे विष कालवणाऱ्या मराठीद्वेष्ट्या अधिकारी/कर्मचारी यांच्यासह काही असंतुष्ट राजकारण्यांनी पुर्णेच्या हक्काचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय नांदेड येथे पळवले यावरही त्यांच्य मनाचे समाधान झाले नाही आणि या असंतुष्ट दृष्ट आत्म्यांनी पुर्णेतील अनेक महत्वाची उपविभागीय रेल्वे कार्यालय नांदेड येथे स्थलांतरीत करण्याचे पाप सातत्याने चालवल्यामुळे पुर्णेकरांमध्ये तिव्र असंतोष परल्याचे पाहावयास मिळत आहे. 


पुर्णेत रेल्वेची तब्बल १८० एक्कर जमीन असून या ठिकाणी सर्व सोईसुविधा उपलब्ध असतांना देखील येथील दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय नांदेड येथे तर रेल्वे कोच निर्मिती कारखाना लातूर येथे पळवण्याचे दुष्कृत्य भाषावाद/प्रांतवादाला खतपाणी घालणाऱ्या मराठीद्वेष्ट्या अधिकाऱ्यांनी असंतुष्टांना हाताशी धरुन केले यावरही त्यांचे समाधान झाले नाही येथील अनेक महत्वाच्या उपविभागीय रेल्वे कार्यालयांसह आतातर पुर्णेकरांच्या हक्काचे निर्धारीत इलेक्ट्रिक लोको ट्रिप शेड देखील नांदेडला पळवण्याचे महापाप सुरु असल्यामुळे पुर्णेकरांमध्ये तिव्र असंतोष पसरला असून दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने पुर्णेकरांवर सातत्याने चालवलेल्या या अन्याया विरोधात पुर्णेकरांनी यल्गार पुकारला असून उद्या बुधवार दि.०८ फेब्रुवारी २०२३ रोजी पुर्णा रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने पुर्णा रेल्वे स्थानकावर धरणे आंदोलन करण्यात येणार असून या जन आंदोलनात तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पुर्णा रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.....

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या